पोलीस आयुक्तांसह संपूर्ण पोलीस बल घटनास्थळी उपस्थित
अमरावती (Amravati Central Jail Blast) : अमरावती जिल्ह्यातील (Amravati Central Jail) जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सहा जुलै च्या मध्यरात्री अचानक कारागृहाच्या परिसरामध्ये एक बॉम्ब (Central Jail Blast) सारखी वस्तू फुटल्याने एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती मिळताच (police force) पोलीस प्रशासन तथा मध्यवर्ती कारागृहाचे प्रशासन घटनास्थळी उपस्थित झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
कारागृहात बरेक जवळ फुटला बॉम्ब
अमरावती जिल्ह्याचे मध्यवर्ती कारागृह (Amravati Central Jail Blast) हे वडाळी परिसरात असून या परिसरात कारागृहाला लागूनच एक खाली जागा असून या जागेत सागवान ची लागवड करण्यात आली आहे तर मागील बाजूस नॅशनल हायवे नं 6 जात असून पुढील बाजूस या कारागृहातील अनेक कर्मचाऱ्यांचे घरे आहेत तसेच डाव्या बाजूला चांदुर रेल्वे मार्ग जात असून उजव्या बाजूला कारागृहासंबंधीतील शेती आहे असे असताना सहा जुलै रोजी मध्यरात्री सदर कारागृहात एक बॉम्ब प्रकारची असलेली वस्तू कारागृहातील एका बॅरेक जवळ फुटली त्यामुळे एकच खळबळ कारागृह प्रशासनात उडाली. सदर घटनेची माहिती (Police Commissioner) पोलीस आयुक्त यांना मिळताच त्यांच्यासह संपूर्ण पोलीस दल व (police force) संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच डीबी पथक व बॉम्बस्कॅड सुद्धा घटनास्थळी पोहोचले असून रिझर्व पोलीस बल तसेच अन्य पोलीस बलांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला असून सदर संपूर्ण परिसर पोलिसांकडून तपासण्यात आला आहे. सदर (bomb exploded) बॉम्ब सारखी वस्तू कुठून व कशी आली याबाबत आता तपास सुरू आहे.