शासनाविरोधात घोषणाबाजी देत इर्विन चौकातून निघाला काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा
अमरावती (Amravati Congress Morcha) : भारतीय राज्यघटनेत शेतकरी अत्यंत महत्त्वाचा घटक असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे केंद्र व राज्य शासनाकडून सतत दुर्लक्ष करण्यात आले आहे ,आजही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला नाही, त्यांच्या मागणीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Congress Morcha) काढण्यात आला. इर्विन चौकातून शासनाविरोधात घोषणाबाजी देत दुपारी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला, आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur), माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले,
देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, पाऊस, थंडी, वादळीवारा यांचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवील्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल. शेतकरी जगेल तरच जग जगेल.
परंतू केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुध्दा केलेली नाही. जिल्हा तर मोठ्या प्रमाणात अवकाळी व अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले ,परंतु याची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांना पोहोचली नाही, मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला परंतु यातील 50% शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कमच मिळाली नाही ,अलीकडे मोठ्या आर्थिक लाभाच्या योजना शासन जाहीर करीत आहे.
परंतु जुन्या योजनांचे पैसे मात्र रोखून ठेवलेले आहे ,आजही निराधार योजना असो की आवास योजना असो याचा निधी शासन स्तरावर रखडलेला आहे. त्यामुळे कित्येकांची घरकुल अर्धवट आहेत कित्येक लाभार्थी निधी अभावी घराचे बांधकाम सुरू केल्याने रस्त्यावर आलेले आहेत. चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान शेतीचे नुकसान झाले परंतु याचेही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे या मागण्यांसाठी (Congress Morcha) काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली जिल्हा कचेरी व हल्लाबोल केला शेतकऱ्यांच्या उत्पादनांना किमान आधारभूत किंमत देऊन त्याचा कायदा तयार करावा अशी मागणी देखील यावेळी देण्यात आली.
सोबतच, राहुलजी गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खा. अनुराग ठाकूर यांच्या तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला, आंदोलनात सुधाकर भारसाकळे,हरिभाऊ मोहोड,बाळासाहेब हिंगणीकर,संजय मार्डीकर,प्रकाश काळबांडे,रामेश्वर अभ्यंकर, सतीशराव हाडोळे, श्रीकांत गावंडे,गिरीशराव कराळे,राम चव्हाण,दिलीप काळबांडे,दयाराम काळे,प्रदीप देशमुख,अरुण वानखडे, प्रवीण मनोहर,रवी पटेल,मुक्कदर खाँ पठाण,समाधान दहातोंडे,प्रकाश चव्हाण,गुणवंत देवपरे, कैलाश आवारे,अमोल होले,निशिकांत जाधव,नामदेव तनपुरे,किशोर देशमुख,सहदेव बेलकर, सुधाकर तलवारे,सतीश पारधी,मनोज गेडाम,अमित गावंडे,अभय देशमुख, महेंद्रसिंह गैलवार,श्रीकांत झोडपे,प्रदीप देशमुख,जहीर शेख,सागर कलाने,मुख्तार भाई,मन्ना दारसिंबे,विनोद पवार,आतिश शिरभाते,श्रीनिवास सूर्यवंशी,अमोल ढवसे,भूषण कोकाटे,भाई देशमुख,सुनील गावंडे,हरीश मोरे, श्रीधर काळे,अंकुश ठाकरे,सिध्दार्थ बोबडे,उत्कर्ष देशमुख, नितेश वानखडे यांची उपस्थिती होती.
शेतकरी विरोधी शासन
शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अनेक आर्थिक योजनांच्या घोषणाबाजी सुरू आहे ,परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा व आर्थिक लाभाचा एकही घोषणा या शासनाकडून केली जात नाही, नुकसान भरपाई त्यांना अद्यापही मिळाली नाही, आजही शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात या अन्याय होत आहे यावरून हे शासन किती शेतकरी विरोधी आहे हे लक्षात येईल
– आमदार यशोमती ठाकूर
शेतकऱ्यांच्या हिताकरिता रस्त्यावर उतरू
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, परंतु अद्यापही त्यांना एक रुपयाची मदत देण्यात आली नाही, मागील पीक विम्याची रक्कम त्यांना मिळाली नाही, केवळ आगामी निवडणुकीच्या (Congress Morcha) पार्श्वभूमीवर नागरिकांची फसवणूक करण्याकरता आर्थिक लाभाच्या योजना सुरू करीत आहे ,परंतु कित्येक जुन्या योजनांचे अद्यापही नागरिकांना पैसे दिले नाही ,त्यामुळे घरकुलाचे काम रखडले आहे, या मागण्यांसाठी आता रस्त्यावरून तीव्र आंदोलन करू.
– जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटी