अमरावती (Amravati crime) : जुन्या वादातून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज गुरुवारी खाेलापुरी गेट (Amravati police) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खरकाडीपुरा परिसरात घडली. प्रतीक प्रवीण जाेशी (25, खरकाडीपुरा) असे मृत युवकाचे नाव आहे.
खरकाडी परिसरातील घटना, आराेपी पसार
मिळालेल्या माहीतीनुसार, हत्येची ही (Amravati crime) घटना खरकाडीपुरा परिसरातील एकवीरा देवी मंदिरासमाेर घडल्याचे सांगण्यात येत आहे. प्रतीक जाेशी याचा आज गुरुवारी रात्री 8 वाजताचे सुमारास त्याचा चुलत भाऊ सुमीत जाेशी (24) याच्यासाेबत वाद झाला हाेता. सूत्रानुसार सुमीत जाेशी हा मद्यधुंद अवस्थेत हाेता. यावेळी सुमीतने प्रतीक जाेशी याच्यावर चाकूने वार केला. यामुळे प्रतीक गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ (Amravati Hospital) जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी जखमी प्रतीक जाेशी यास मृत घाेषित केले. याप्रकरणी (Amravati police) पाेलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर रूग्णालयात मृतकाचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांची गर्दी झाली हाेती. दरम्यान, आराेपी सुमीत जाेशी हा पसार झाला.