स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
तळेगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गोवंश चोरीच्या घटना
धामणगाव रेल्वे (Amravati Crime) : चारचाकी वाहनातून गोवंशीय जनावरांची चोरी करणाऱ्या कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागली असून तळेगाव दशासर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोवंश चोरी प्रकरणात यवतमाळ येथील तीन चोरट्यांचा अटक करण्यात आली आहे.
दिनांक २८ जानेवारी रोजी तळेगाव दशासर पोलिसांच्या हद्दीतील सुलतानपूर येथील किशोर किसनराव कोकाटे यांच्या मालकीची गाय कि.अं. २० हजार घराबाहेर बांधुन ठेवली असतानां अज्ञात इसमांनी चोरुन नेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. (Amravati Crime) दरम्यान अशाच प्रकारचे दोन गुन्हे नांदगाव खंडेश्वर पोलिसात सुद्धा दाखल असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक विशाल आनंड यांनी जनावरे चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालुन सदर टोळीला पकडण्यासाठी सुचना निर्गमीत केल्या होत्या.
सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Amravati Crime) पथकाने समांतर तपास केला असता पोलीस रेकॉर्डवरील आरोपीचा शोध कामी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले.दरम्यान गोपनिय सूत्रांच्या माहितीवरून शेख राजीक शेख रज्जाक रा. अलकबीर नगर, यवतमाळ हा त्याचे साथीदारासह जनावरे चोरी करीत असुन तो सदया जनावरांची रेकी करण्याकरीता देवगाव चौफुली येथे त्याचे साथीदारासह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यावेळी मोठ्या शिताफीने गुन्हे शाखेच्या पथकाने शेख राजीक शेख रज्जाक वय २८ वर्ष, रा. अलकबीर नगर, यवतमाळ व त्याचा साथीदार अफजल उर्फ सोनु खान अफसर खान पठाण वय २८ वर्ष, रा. रुग्नालय सोसायटी यवतमाळ याला ताब्यात घेतले.
दोघांनाही गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनीच सुलतानपुर व नांदगाव खंडेश्वर हद्दीतुन दोन जनावरे त्यांचे ईतर ५ साथीदारासह चोरी केल्याची कबुली देवून जनावरे चोरी केल्यानंतर कटाई करीता मोहीन खाँ शब्बीर खॉ पठाण वय २५ रा. पठाण चौक, नेर जि. यवतमाळ याला दिल्याचे सांगीतले.मिळालेल्या माहितीवरून त्याला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या व घटनेतील ईतर फरार ४ आरोपीतांचा शोध (Amravati Crime) गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.यावेळी गुन्हयात वापरलेली इनोव्हा चारचाकी गाडी किंमत अंदाजे ५ लाख ५० हजार रु, एक मोटर सायकल कि.अं. ६० हजार ,एक मोबाईल कि.अं. १० हजार रु असा एकुण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
आरोपीतां कडुन एकुण ३ गुन्हयांची उकल करण्यात आली असुन त्यांना पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. तळेगाव दशासर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद,अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत,स्थानिक गुन्हे शाखेचे (Amravati Crime) पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम,श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मराांगे, दिनेश कनोजीया, गुणवंत शिरसाठ, चेतन गुल्हाने, सागर धापड, रितेश गोस्वामी व चालक हर्षद घुसे यांनी केली.