अमरावती (Maratha Seva Sangh) : मराठा सेवा संघ (Maratha Seva Sangh) केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्देशनुसार मराठा सेवा संघाची अमरावती जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. याध्ये जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र आडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून माजी उपजिल्हाधिकारी मनोहर कडू आणि मनपाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षपदी सुरेंद्र आडे, मनोहर कडू आणि नरेंद्र वानखडे यांची जिल्हासंघटकपदी निवड
मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) काम जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर विस्तारित करण्यासाठी यावेळी जंबो कार्यकारिणी गठित करण्यात आली असून यामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमुखपदाची जबाबदारी विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ वैशाली गुडधे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासोबतच कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश राऊत, गजानन टाले, प्रा. निलेश कडू, निकेश बोंडे व सागर सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा सचिवपदी संजय ठाकरे, सहसचिवपदी सोपान साबळे तर कार्यालयीन सचिव म्हणून मनोज सोळंके यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी प्रकाश राऊत, गजानन टाले, प्रा. निलेश कडू, निकेश बोंडे व सागर सोनटक्के
कोषाध्यक्षपदी प्रशांत मोंडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून महिला विभागाची प्रचार व प्रसाराकरीता महसूल विभागाच्या सहआयुक्त वैशाली पाथरे, मैथिली पाटील, पल्लवी यादगिरे,मंजू ठाकरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून माध्यम सल्लागार गौरव इंगळे देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून महिला (Economic Development Corporation) आर्थिक विकास महामंडळाचे सुनील सोसे, मनपाचे अभि. शुभम शेरकर, सतीश यादव, बंडोपंत भुयार, प्रा. शरद बंड, प्रा. जयंत इंगोले, संजय ढोरे, श्रीकृष्ण बोचे, सचिन निर्मळ, विजय गाडगे, स्वप्निल दिवाण, हेमंत गावंडे, अजय लेंडे, अरविंद भूगुल, गजानन जवंजाळ, सतीश देवले, संदीप वैद्य, सुधीर केने, समीर नांदुरकर, शुभम राणे, राम बावस्कर, समीर नांदुरकर, शुभम भोकरे, संतोष ठाकरे, समीर लेंडे, किशोर पखाण, नितीन ठाकरे, डॉ. सुरेश रहाटे, विलास गणेशपुरे,अजय इंगोले, प्रणव सोनटक्के, प्रा. वैभव म्हस्के, प्रा.श्याम मानकर, दिलीप चव्हाण यांचा सहभाग करण्यात आला आहे.
जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शक समितीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ लुंगे, अश्विन चौधरी, चंद्रकांत मोहिते, प्रा. प्रफुल्ल गुडधे, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, दिनकरराव कडू तसेच मराठा सेवा संघाचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Maratha Seva Sangh) मराठा सेवा संघाचे कार्य तसेच संघटनेला अधिक बळ देण्यासाठी ही कार्यकारिणी जोमाने काम करेल असा विश्वास वरिष्ठांकडून व्यक्त करण्यात आला आहे.