उत्तराखंड राज्यातील ग्राम विकास योजनांचा केला अभ्यास
रिसोड (Amravati Division) : शासन,यशदा पुणे व राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान यांचे विद्यमाने अमरावती विभागातील जि.प.मधील अधिकारी व पदाधिकारी यांचा उत्तराखंड अभ्यास दौरा 11 ते 17 डिसेंबर 2024 या कालावधीत चांगल्या प्रकारे संपन्न झाला.यामध्ये अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचे निवडक पदाधिकारी,अधिकारी, कर्मचाऱ्यांची सहभागी झाले. सदर अभ्यास दौरा साठी रिसोड पं. स.चे गट विकास अधिकारी किशोर लहाने व गोभणी ग्रा.पं. चे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र खरबळ यांची निवड करण्यात आली होती.
आपला महाराष्ट्राचा हा उत्तराखंड राज्याचा पहिला दौरा असून या अभ्यास दौऱ्यामध्ये उत्तराखंड राज्याचे पंचायत राज संस्थांना भेटी देण्यात येऊन तेथील कार्यप्रणाली विषयी माहिती जाणुन घेण्यात आली. उत्तराखंड राज्यात राबविण्यात येणारे ग्राम विकास योजना अंमलबजावणी विषयक (Amravati Division) अभ्यास या दौऱ्यामध्ये करण्यात आला असून एकंदरीत हा दौरा यशस्वीपणे पार पडला असल्याची प्रतिक्रिया रिसोड गट विकास अधिकारी किशोर लहाने यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासन,यशदा पुणे,रा.ग्रा.स्व. अभियान व वाशिम जि.प.यांनी अभ्यास दौऱ्यात निवड केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.