अमरावती (Amravati Education Department) : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (Education Department) १६३ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची केंद्र प्रमुखपदी पदोन्नतीकरीता यादी जाहीर करून त्यांना १२ जुन पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु ही यादी नियमबाह्य असल्याचा आरोप करीत प्रहार शिक्षक संघटनेने यादीवर आक्षेप घेतला आहे. ज्या सहायक शिक्षकांनी उच्च शैक्षणिक व्यावसायिक पात्रता घेतली आहे. त्यांना देखील या प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.अन्यथा आंदोलन करू असा इशारा (Prahar teachers union) संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
१६३ पदवीधर शिक्षक, मुख्याध्याकांची यादी जाहीर
जिल्ह्यात सुमारे ५२ केंद्रप्रमुखांच्या रीक्त जागांवर पदोन्नतीने पदस्थापना करायची आहे. याकरीता शिक्षण विभागाने (Education Departmen)t पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांना पात्र करीत ६ जुन रोजी जिल्ह्यातील १६३ जणांची सेवाजेष्ठता यादी तयार प्रसिध्द केली आहे. तर १२ जुन पर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानंतर लगेच पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होईल. परंतु या अंतिम सेवाज्येष्ठता यादीवरच प्रहार शिक्षक संघटनेने आक्षेप घेतला असुन प्रसिध्द केलेली यादी नियमबाह्य असल्याचा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्यामते प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर तीन वर्षे पेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण केली असेल अश्या उमेद्वारामधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल असे शासन निर्णयात स्पष्ट नमूद आहे.
व्यावसायिक पात्रता धारक शिक्षकांना वगळले
‘प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) म्हणजे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. पदवीधर बी.एड. ही व्यावसायिक अहर्ता धारण करणारे प्राथमिक शिक्षक असणे आवश्यक आहे. म्हणजेच ही व्यावसायिक अहर्ता धारण केलेल्या दिनांकापासून ३ वर्षाचा अनुभव पूर्ण करणारे सर्व शिक्षक पात्र ठरतील असे स्पष्ट नमूद आहे. परंतु (Education Department) शिक्षण विभागाने या आदेशाला केराची टोपली दाखवित यामध्ये केवळ पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा समावेश केला आहे.त्यामुळे या यादीवर आक्षेप नोंदवित ही यादी नव्याने प्रसिद्ध करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील महेश ठाकरे यांनी विभागीय आयुक्त , मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. उपायुक्त संतोष कवडे यांनी याबाबत शिक्षण विभागाला आदेशित करू असे म्हटले आहे.यावेळी संघटनेचे विभागीय सचिव अमोल आगे, अमरावती जिल्हाध्यक्ष शरद काळे , अकोला कार्याध्यक्ष अमर भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचा आरोप
यापुर्वी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या केंद्रप्रमुख पदोन्नती तात्पुरत्या सेवाज्येष्ठ यादीमध्ये फक्त विषय, पदवीधर शिक्षक व पदवीधर मुख्याध्यापक यांचाच समावेश केला होता. त्याचवेळी याचा विरोध करण्यात आला होता. परंतु याची दखल (Education Department) शिक्षण विभागाने घेतली नाही. अखेर पुन्हा ही प्रकिया सुरू केली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया नियमबाह्य आहे.याबत ग्रामविकास विभाग व विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन आक्षेप घेतला आहे.
– महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना