प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होऊन अकोला कडे जाताना काळाने घातली झडप
अमरावती (Amravati Accident) : प्लॉटचां खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करून अकोला कडे परतणाऱ्या दोघांवर काळाने झळप घेतली. शहरातील राष्टीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर गुरुवारी रात्री विरुद्ध दिशेने कार चालवल्याने समोरून येणाऱ्याअज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या (Amravati Accident) अपघातात दोघांचा अंत झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले. मृतक एकाराष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिली जोरदार धडक
गुरुवारच्या रात्री अकरा वाजता च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर कारचा भीषण अपघात घडला. प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याकरिता अकोला येथून वॅगनार कारने पाच इसम आले होते. या दरम्यान प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार आटोपून गौरी इन हॉटेल येथे जेवण करायला गेले. तेथून जेवण झाल्यानंतर अकोलाजात असताना कार चालकाने आपली कार पलटविण्याचा प्रयत्न केला असता, त्याचवेळी समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने व्हॅगनार कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Amravati Accident) सिव्हिल लाईन मोठी उमरी जिल्हा अकोला येथे राहणारे ५० वर्षीय विजय जगन्नाथ मदनकर ३६ वर्षीय नकुल विजय तोडकर मृत्यू (Amravati Crime) झाला. तर संदीप माणिक गावंडे मुकेश सराफ यासोबतच एक इसम सुद्धा गंभीर जखमी झाला आहे.
या (Amravati Accident) अपघातात वॅगनार कार समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताच्या नंतर रस्त्यावर ट्राफिक जाम झाल्याने क्रेनच्या साह्याने वॅगनार कारला बाजूने करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ सह गाडगे नगर पोलीस तात्काळ दाखल झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृतक एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी होते. दोन्ही मृतकाचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी (Amravati Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले.