अमरावती (Amravati Mahavitran) : महावितरण अमरावती परिमंडळात अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) दिपाली माडेलवार (Dipali ModelWar) या पदी बुधवार दिनांक ३ जुलै रोजी रूजू झाल्या आहेत. परिमंडळात अधीक्षक अभियंता (पा.आ.) या पदावर कार्यरत असलेले दिपक देवहाते यांची अधीक्षक अभियंता अमरावती जिल्हा या पदावर बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
वर्ष १९९९ मध्ये तत्कालीन एमएसईबी बोर्डात नागपूर येथे सहाय्यक अभियंता म्हणून रूजू झालेल्या दिपाली माडेलवार (Dipali ModelWar) यांच्या पाठिशी तत्कालीन बोर्ड आणि (Mahavitran) महावितरणमध्ये काम करण्याचा २५ वर्षाचा अनुभव आहे. सहाय्यक अभियंता म्हणून रूजू झाल्यानंतर, सरळ सेवा भरतीतून उपकार्यकारी अभियंता वर्धा जिल्हा कार्यालय, त्यानंतर सरळ सेवेतूनच अतीरिक्त कार्यकारी अभियंता नागपूर जिल्हा महाल विभागात त्यांनी काम केले आहे. यावेळी (Amravati Mahavitran) महावितरणमध्ये प्रथमच दामिनी पथकाची निर्मिती त्याच्या विभागात करण्यात आली. नंतर हे दामिनी पथक संपूर्ण राज्यभर निर्माण करण्यात आले. त्यानंतर २०१३ मध्ये सरळ सेवेतून कार्यकारी अभियंता पायाभूत आराखडा म्हणून त्यांची मुख्य कार्यालय येथे पदस्थापना झाली. नंतर कार्यकारी अभियंता प्रशासन नागपूर आणि कार्यकारी अभियंता सावनेर विभागाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पदोन्नतीवर त्यांची बदली अमरावती येथे अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)या पदावर झाली आहे.
मुळच्या नागपूरच्याच असलेल्या दिपाली माडलेवार (Dipali ModelWar) ह्या अमरावती येथील अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) हे पद स्विकारणाऱ्या पहिला महिला आहेत. (Mahavitran) ईलेक्ट्रिक इंजिनिअरची पदवी संपादन केलेल्या दिपाली माडेलवार (Dipali ModelWar) यांनी एम.बी.ए. फायनांन्स आणि अकाऊंटटमधेही पदवी संपादन केली आहे.