शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचा आरोप
अमरावती (Amravati Municipal Corporation) : अमरावती मनपाने कर सर्वेक्षणासाठी दिलेल्या कंत्राटामध्ये तसेच विशिष्ट मालमत्तांना चुकीच्या पद्धतीने कर लावणे किंवा कर आकारणे असे प्रकार करीत मनपा अधिकाऱ्यांनी मनपा व शासनाच्या तिजोरीला चुना लावत करोडोंचा कर घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
अमरावती महानगरपालिकेत (Municipal Corporation) कर सर्वेक्षण व इतर अनुषंगिक कामासाठी निविदा प्रसिद्ध करून विशिष्ट कंत्राटदाराला मदत करण्यासाठी त्याला पोषक अशा अटी व शर्ती निविदेमध्ये समाविष्ट करून गुन्हेगारी स्वरूपाचे षड्यंत्र रचून मनपा व शासनाच्या पैशाची लूट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर सर्वेक्षणाबाबत असलेल्या निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच अटी व शर्तीचे कागदपत्रे कशा पद्धतीने तयार करावे हे स्थापत्य कंपनी व कर मूल्यांकन अधिकारी यांनी संगमत करून तयार केलेले आहे. त्यामुळे या निविदेच्या अटी व शर्ती स्थापत्य कंपनीला निविदा मिळावी या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या आहे व इतर कोणी या निविदेमध्ये भाग घेतल्यास त्यांना अपात्र करण्याचा व्यवस्था मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली होती, असा आरोप सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी निवेदनातून केला आहे.
अमरावती महानगरपालिकेने (Amravati Municipal) यापूर्वी सभागृह अस्तित्वात असताना सदर काम करण्यासाठी सात कोटी रुपये देण्याचे ठरविल्रे होते. परंतु आर्थिक लाभापोटी तत्काल्रीन आयुक्त, कर मूल्यांकन अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी संगनमत करून सदर कामात कंत्राटदाराला विशेष मदत करून जवळपास 30 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचवला , अमरावती महानगरपालिकेत सभागृह अस्तित्वात नसताना व कायद्यानुसार बिगर आयएएस असलेत्रे आयुक्त पात्र नसताना प्रशासक म्हणून ठराव घेऊन मनपाचे आर्थिक नुकसान करून आपल्या पदाचा गैरवापर करून स्थापत्य कंपनीला फायदा पोहोचण्यासाठी सदर कर कंत्राट देण्यात आलेला आहे,असे सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी म्हटले आहे.
तसेच स्थापत्य कंपनीने केलेल्या करारनाम्यानुसार तांत्रिक पात्रता नसलेल्या बिगर तांत्रिक लोकांकडून (Amravati Municipal) मनपा क्षेत्रातील सर्व मात्रमत्तेची त्रुटी पूर्ण मोजणी करून त्या मोजणीच्या आधारावर संपूर्ण शहरातील मात्रमत्तेने चुकीचा व जास्तीचा कर त्रावलेला आहे आणि मात्रमत्तेची संख्या वाढवण्यासाठी एका मालमत्तेची अनेक मालमत्तेमध्ये विभागणी करून मनपाची कोटी रुपयाची आर्थिक लूट केल्रेली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार व आर्थिक अपहार झालेला आहे. त्यामुळे सदर बाबीची सखोल चौकशी करून आपल्या पदाचा दुरुपयोग करून आर्थिक लाभ मिळून देण्याच्या हेतूने कंत्राट देण्याच्या प्रक्रिये मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
मनपाला दरवर्षी २० कोटीचे आर्थिक नुकसान
मनपाचे कर अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांनी आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने संबंधित कंपनीला मदत करून अतिशय जास्त दरात सदर काम दिलेले आहे. वास्तविक शासनाने महानगरपालिका क्षेत्रात कर सर्वेक्षण व संबंधित कामासाठी विशिष्ट दिशा निर्देश दिलेले असून त्यानुसार (Amravati Municipal Corporation) महानगरपालिकेला सदर सर्वेक्षणासाठी व इतर अनुषंगिक कामासाठी प्रति घर किवा मात्रमत्ता जास्तीत जास्त 223 रुपये पर्यंत मोबदला देण्याचे निर्देश असताना अमरावती महानगरपालिकेने स्थापत्य कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांच्या आर्थिक लाभापोटी प्रति घर किंवा मालमत्ता 750 देण्याचे मान्य केले. ज्यामुळे मनपाला जवळपास 20 कोटी रुपयांचा आर्थिक नुकसान होत आहे असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी केला आहे.
सॉफ्टवेअर खरेदीत भ्रष्टाचार
विशेष म्हणजे याच स्थापत्य कंपनीने कर सर्वेक्षण व अनुषंगिक बाबी या कामासाठी (Amravati Municipal Corporation) पनवेल महानगरपात्रिकेमध्ये प्रति घर 387 रु प्रमाणे काम केलेले आहे.अतिशय गंभीर बाब म्हणजे कर प्रणाली सॉफ्टवेअरसाठी याच कंपनीने पनवेल महानगरपालिकेला 1 लाख 4५ हजार मध्ये व काही ठिकाणी 5 ते 10 लाख रुपयामध्ये सदर सॉफ्टवेअरचा पुरवठा केलेला आहे .परंतु अमरावती महानगरपात्रिकेने यासारखेच असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे1 कोटी 33 लाख रुपयांमध्ये घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, असे सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी निवेदनात नमूद केले आहे.
बिल्डर लॉबीला लाभ देण्याचा प्रयत्न
अमरावती महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे कर अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक मोठ्या व्यावसायिक इमारतींना व अनेक बिल्डरच्या नावाने असलेल्या भूखंडांना आर्थिक लाभ देऊन अतिशय कमी कर ल्रावलेला आहे किंवा काही मालमत्तांना तर करच लावलेला नाही. त्यामुळे (Amravati Municipal Corporation) अमरावती महानगरपालिकेचे गेल्या दहा वर्षात जवळपास 200 कोटीच्या वर आर्थिक नुकसान झालेले आहे. सदर बाब अतिशय गंभीर असून अशा स्वरूपाचा कर घोटाळा नवी मुंबई महानगरपालिकेत सुदधा घडलेला होता .त्यामध्ये संबंधित सर्व अधिकाऱ्यांविरुदध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर अमरावती महानगरपालिकेमध्ये झालेल्या तब्बल 200 कोटीचा कर घोटाळ्याची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्या कर अधिकारी व इतर सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची संपूर्ण मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी केली आहे.