उपसमितीने मनपा अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती
अमरावती (Amravati Municipality) : अमरावती मनपाच्या तत्कालीन प्रशासकाने आपल्या कार्यकाळात केलेल्या गैरव्यवहार व अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या निर्देशान्वये गठीत करण्यात आलेल्या (Amravati Municipality) जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय उपसमितीची पहिली बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सात सदस्यीय उपसमितीने अमरावती मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती घेत अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणाची संबंधित सर्व दस्तावेज येत्या सोमवारी सादर करण्याचे निर्देश दिले. या उपसमितीची पुढील बैठक 31 जुलै रोजी होणार असल्याचे समजते.
सोमवार पर्यंत दस्तावेज सादर करा, पुढील बैठक 31 जुलै रोजी
तत्कालिन प्रशासक व आयुक्ताने केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारने दिलेल्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या उच्चस्तरीय उपसमितीची पहिली बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीसाठी (Amravati Municipality) अमरावती मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांना उपस्थित राहण्याचे बजाविण्यात आले होते. सदर बैठकीस उपस्थित मनपा अधिकार्यांची उपसमितीमधील सदस्यांनी झाडाझडती घेत येत्या सोमवारपर्यंत गैरव्यवहार प्रकरणातील मुद्यांशी संबंधित सर्व कागदपत्र समितीपुढे सादर करण्याचे निर्देश उपसमितीने दिले.
यासोबतच उपसमितीमधील सदस्यांनी (Shiv Sena) शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल खराटे (Sunil Kharate) यांनी केलेल्या तक्रारीतील विविध मुद्यांच्या अनुषंगाने काही सवाल-जवाब मनपा अधिकार्यांना केल्याची माहिती आहे. सदर प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती आल्यानंतर उपसमिती त्याची चौकशी करणार असून चौकशीअंती त्यासंदर्भात तयार झालेला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या उपसमितीची दुसरी बैठक 31 जुलै रोजी होणार असल्याचे समजते.
पारदर्शीपणे चौकशी व्हावी – सुनिल खराटे
अमरावती मनपाचे (Amravati Municipality) आयुक्त व तत्कालीन प्रशासक यांनी विकासक आणि कंत्राटदारांशी हात मिळवीत मनपामध्ये नियमबाह्य पद्धतीने विविध ठराव पारित केले. ठराव पारित करताना त्याची प्रोसिडिंग बुक मध्ये नोंद घेण्यात आली नाही. ठरावाच्या अनुषंगाने करण्यात येणार्या कामाच्या वर्क ऑर्डर व करारनामा नियमांना फाटा देत करीत तसेच अटी व शर्ती बदलून विकासक व कंत्राटदारांना फायदा पोहोचविण्याचा प्रकार मनपात घडला आहे. या सर्व प्रकरणांची उपसमितीने अत्यंत पारदर्शीपणे चौकशी करावी, अशी अपेक्षा तक्रारकर्ते (Shiv Sena) शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी व्यक्त करीत चौकशीअंती मनपातील मोठे घबाड बाहेर येईल, असा दावा केला आहे.