आ. सुलभाताई खोडके यांच्या पुढाकाराने सुधारतेय महापालिका शाळांचा दर्जा
अमरावती (Amravati Municipality School) : महापालिकांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असतांना, आज हाऊसफुल्लचे बोर्ड लागत आहे. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने शुकशुकाट पसरलेल्या महापालिकांच्या शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहे. आ. सुलभाताई संजय खोडके यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतल्याने अमरावती महापालिकांच्या शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासह मनपाच्या शाळा मॉडेल शाळा म्ह्णून हायटेक झाल्या आहेत. अशातच आता आ. सुलभाताई खोडके यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती खनिकर्म विभागाच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान अमरावती अंतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल विव्हसॉनिक कंपनीचे साईज ६५ इंच साहित्य पुरविण्यासाठी २० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४ लक्ष निधी प्रथम टप्प्यात मिळणार असल्याने आता लवकरच महापालिकेच्या शाळा डिजिटल होणार आहे.
जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान अमरावती मार्फत २० लक्ष निधी मंजूर
गरीब व आर्थिक दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य परिवारातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे असेल तर, आजच्या बदलत्या युगात महापालिकांच्या शाळांनी अद्यावत व आधुनिकतेची कास धरणे जरुरीचे आहे. अमरावती महानगर पालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासह त्याठिकाणी चांगल्या शैक्षणिक सुविधा व भौतिक संसाधनाची पूर्तता करण्याला घेऊन आ. सुलभाताई संजय खोडके यांनी पुढाकार घेतल्याने आज महापालिका शाळांचे चित्र पालटले आहे. दरम्यान जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान द्वारे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत महापालिकांच्या शाळा डिजिटल करण्याचे काम हाती घेण्याबाबत आ. सुलभाताई खोडके यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी महापालिकेला पत्र देऊ सूचना केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला असता, ३ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने सदर कामाची तांत्रिक मंजुरी व अंदाजपत्रक सादर करण्याबाबत महापालिकेला पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशित करण्यात आले.
शाळा हायटेक झाली तरच विद्यार्थ्यांचा कल वाढेल : आ. सुलभाताई खोडके
त्या अनुषंगाने मागील २३ जुलै २०२४ रोजी अमरावती महापालिका प्रशासनाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील शाळा डिजिटल करण्याला घेऊनचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान अमरावती यांचे कडे सादर करण्यात आला. दरम्यान आ. सुलभाताई खोडके यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीकडे पाठपुरावा केला असता, समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभाग अंतर्गत जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी महापालिकेच्या शाळांमध्ये इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल विव्हसॉनिक कंपनीचे साईज ६५ इंच साहित्य पुरविण्यासाठी २० लक्ष निधी मंजूर करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. त्यापैकी ४ लक्ष निधी प्रथम टप्प्यात वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
दोन वर्षांपासून महापालिकांच्या शाळांमध्ये नर्सरी केजी -१ ,केजी-२ व इंग्रजीचा पहिला वर्ग सुरु आहे. तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड , नवीन डेक्स बेंच लागले असून प्रत्येक शाळांमध्ये वॉटर कुलर व वॉटर प्युरीफायर बसविण्यात आले आहेत. महापालिकांच्या सर्व शाळांची दुरुस्ती करण्यात आली असून शाळांना उच्च माध्यमिक शाळांची दर्जावाढ करण्यात आली आहे. तसेच महापालिकांच्या शाळांमध्ये डिजिटलायझेशन,तांत्रिक आधुनिकीकरण व आय. टी. सर्विलांस प्रणालीचा पुरवठा करण्यात आला आहे. याच शृंखलेत आता इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल लागणार असल्याने महापालिकेच्या शाळा डिजिटल झाल्याने डिजिटल साक्षर शिक्षण प्राप्तीसाठी सज्ज झाल्या आहेत. या संदर्भात महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करण्याची सूचना सुद्धा आमदारांच्या वतीने करण्यात आली आहे