शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांची मागणी
अमरावती (Amravati Municipality) : मनपाची मुख्य प्रशासकीय इमारत शिकस्त व कमजोर असताना देखील तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून या (Amravati Municipality) इमारतीवर तिसरा मजला उभारण्यात आला. अशा इमारतीचा एक भाग असलेला संगणक कक्षाची भिंत नुकतीच कोसळल्यामुळे ही इमारत तकलादू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर बाब लक्षात घेता यामधे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी केली आहे. सुनील खराटे यांनी मनपातील अनियमितता प्रकरणी राज्य सरकारकडे केलेल्या तक्रारीमध्ये देखील वरील मुद्द्याचा समावेश केला आहे, हे विशेष.
अमरावती मनपाची (Amravati Municipality) मुख्य इमारत शिकस्त असताना त्याकडे दुर्लक्ष करीत तत्कालीन प्रशासकांच्या आदेशाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून तिसऱ्या मजल्यावर आयुक्त कक्ष ,कॉन्फरन्स हॉल, आमसभा हॉल, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या कक्षाची उभारणी केली .वास्तविक पाहता मनपाची मुख्य इमारत ही जवळपास 100 वर्षे जुनी असून ती शिकस्त व कमजोर झाली होती. असे असताना देखील तत्कालीन प्रशासकांनी आपल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेत तिसऱ्या मजल्याची उभारणी केली. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची चर्चा देखील मनपात रंगली होती. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रविवारी मुख्य इमारतीच्या बाजूला असलेली संगणक कक्षाची भिंत कोसळली.
ही घटना बघता (Amravati Municipality) मनपाची मुख्य प्रशासकीय इमारत किती मजबूत आहे? व किती सुरक्षित आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे .दररोज हजारो लोकांची ये जा असताना जवळपास 100 वर्ष जुन्या इमारतीवर तब्बल आठ कोटी रुपये खर्च करीत नवीन मजला बांधण्याचा अट्टाहास तत्कालीन प्रशासक व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी का केला? हे न उघडणारे कोडे असून सदर बाब भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपास बळ देणारी असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी म्हटले आहे. शिक स्त व कमजोर इमारतीवर अमरावतीकरांचे करोडो रुपये खर्च करून नवीन मजला उभारणाऱ्या तत्कालीन प्रशासक व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी तसेच ती इमारत सील करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी केली आहे.
आमसभेत पारित झाला होता प्रस्ताव
अमरावती मनपाची (Amravati Municipality) इमारत जुनी व कमजोर झाली असून या इमारतीवर नवीन बांधकाम करण्याऐवजी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपूर्वी आमसभेत एकमताने पारित पारित करण्यात आला होता. असे असताना देखील तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्याने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत आपल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेत करोडो रुपये खर्च करून शिकस्त इमारतीवर नवीन बांधकाम केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Sunil Kharate) यांनी केला आहे.
तक्रारीत याच मुद्द्याचा समावेश
अमरावती मनपाचे (Amravati Municipality) तत्कालीन आयुक्त व प्रशासक यांनी केलेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली असून या तक्रारीमध्ये सदर मुद्द्याचा समावेश केला आहे. अमरावती मनपाच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड बांधून बांधकाम करताना निविदा न काढताच आठ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.