पप्पू पाटील यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन
अमरावती (Amravati Municipality) : अमरावती शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे पडून आहेत. कचरा उचलणारे कंत्राटदार हा कचरा उचलण्यास तयार नाहीत. मनपाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने सध्या अमरावती शहरात स्वच्छतेची एैशीतैशी झालेली असून पुढील आठ दिवसात हा कचरा उचलल्या गेला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा अल्टीमेटम मनसे नेते पप्पू उर्फ मंगेश पाटील (Pappu Patil) यांच्या नेतृत्वात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी (Amravati Municipality) अमरावती महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) दिलेल्या निवेदनातून केला आहे.
अमरावती शहरात नगरसेवक नसल्याने प्रशासनाच्या हाती संपूर्ण कारभार आला आहे. शहरात कुठे कचरा उचलणारी गाडी जाते किंवा नाही, कचऱ्यांचे उचलले जाऊन त्यांची विल्हेवाट लावली जाते किंवा नाही याकडे (Amravati Municipality) मनपा प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात अमरावती शहराच्या विविध भागात आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. शहरात ठिकठिकाणी असे प्रकार झाल्याने अनेक वस्त्यांमध्ये रोगराई पसरली आहे. विशेषत: शहरात सण्या चिकन गुनिया, डेंग्यू, मलेरियाच्या पेंशटची भरमार झाली आहे. मात्र मनपा प्रशासन या विषयात केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याने कचरा कंत्राटदारांची चांदी झाली आहे. कंत्राटदार आणि मनपाचे अधिकारी मिळून सगळी मलाई खात असल्याने अमरावती शहरवासीयांना मात्र त्रास सहन करावा लागतो आहे.
मात्र मनसे असे होऊ देणार नाही. ज्या भागात कचऱ्याची घंटागाडी जात नाही तेथील नागरिकांच्या शेकडो तक्रारींचे निरसण तातडीने करण्यात यावे तसेच ज्या भागात आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस कचरा पडून राहतो अशा भागात काम करणाऱ्या कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच पुढील आठ दिवसात अमरावती शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायला हवी अन्यथा मनसे आपल्या स्टाईने आंदोलन करेल आणि त्यासाठी (Amravati Municipality) अमरावती मनपा प्रशासन जबाबदार असेल असे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी मनसेचे अमरावती शहराध्यक्ष धीरज तायडे, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष प्रवीण डांगे, बडनेरा शहराध्यक्ष गौरव बांते, जनहित बडनेरा शहराध्यक्ष बबलू आठवले यांच्यासह तुषार वाढणकर, पवन सावरकर, कौशल चार्थड, अमर महाजन, जितेश सोनोने, मनिष फाटे, सुशी पाचघरे, विनोद गद्रे, साजन हिवरकर, धीरज वानखडे, पप्पू तंतरपाळे, प्रशांत येलकर, विक्की थेटे आदींची उपस्थिती होती.