अमरावती (Amravati newborn baby) : एक दिवसाच्या नवजात बाळाला (Amravati newborn baby) मंदिरामागील नाल्यात फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच, गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले. ही घटना धारणी तालुक्यातील मोगर्दा गावातील असून, ग्रामीण रूग्णालयातील एसएनसीयू वार्डात (SNCU Ward) बाळ धोक्याबाहेर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
धारणी तालुक्यातील मोगर्दा गावात माता मंदिर आहे. ३० जुलैला पहाटे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या काही गावकऱ्यांना मंदिराच्या मागे असलेल्या एका नाल्यात (newborn baby) बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आला. त्यांनी शोध घेतला असता नुकतेच जन्मलेले एक छान, गोंडस बाळ कुचळयात पडलेले दिसले. त्या बाळाच्या पोटाची नाळ सुध्दा कापण्यात आलेली नव्हती. गावकऱ्यांनी तातडीने बाळाला जवळ घेऊन इतर गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी १०२ वर कॉल करून गावात रूग्णवाहिका बोलविली.
रूग्णवाहिकेचे चालक श्याम बरडे हे डॉक्टर सचिन राठोड, एएनएम स्वाथी राठोड यांच्यासह गावात दाखल झाले आणि त्यांनी तातडीने (newborn baby) बाळाला रूग्णवाहिकेने धारणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. (SNCU Ward) रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. दयाराम जावरकर यांच्या नेतृत्वात डॉ. अश्विन पवार यांनी तातडीने बाळाला एसएनसीयू वार्डात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले. बाळ हे २४ तासाआधी जन्मले असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत समोर आले. बाळाला तातडीने उपचार मिळाल्याने सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून तो सदृळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दुसरीकडे मोगर्दा गावाचे पोलिस पाटील यांनी याबाबत तातडीने धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांना माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार अशोक जाधव यांनी हेड कॉस्टेबल गणेश धुळे यांच्यासोबत तातडीने मोगर्दा गाव गाठून घटनास्थळ पंचनामा केला आणि (newborn baby) बाळाला कुणी जन्म दिला, त्याला का फेकण्यात आले, याबाबत तपास सुरू केला आहे. आजपर्यंत मुलगी जन्माला आली म्हणू,न तिला जन्मता:च वाऱ्यावर सोडण्याच्या अनेक घटना घडल्या. पण, मुलगा झाला असताना देखील कुण्या निर्दयी मातेने त्याला मंदिरामागे फेकले, याचा कसून शोध ठाणेदार अशोक जाधव घेत आहेत. किंबहुना अनैतिक संबधातून गरोदर झालेल्या कुण्या मुलीने हा प्रकार केला असावा, या दिशेने देखील (Amravati Police) पोलिस तपास करीत आहेत.