देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati news: शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Amravati news: शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल…बघा VIDEO
अमरावतीकरीअरविदर्भ

Amravati news: शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/30 at 4:31 PM
By Deshonnati Digital Published April 30, 2024
Share
अमरावती (Amravati news) : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (Zilla Parishad) मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती व शिक्षणाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० एप्रिल रोजी व (Zilla Parishad) जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव पेठ येथील प्रांगणात (Amravati Education) अमरावती विभागीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी  यांचे मार्गदर्शन

अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी (भा.प्र.से.) यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून (Amravati Education) अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार जोशी हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावतीचे प्राचार्य मिलिंद कुबडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोलाच्या प्राचार्य रत्नमाला खडके, यवतमाळ डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) डॉ. कैलास घोडके, जिल्हा परिषद अमरावतीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, अकोलाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार, शिक्षणाधिकारी (योजना) निखिल मानकर, जेष्ठ अधिव्याखाता प्रेमला खरटमोल, उपशिक्षणाधिकारी गजला खान, अमरावती (Panchayat Committee) पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, नांदगाव खंडेश्वरच्या प्रमिला शेंडे,  आय. ए.एस अकादमीचे संचालक नरेशचंद्र काठोळे, बालविकास प्रकल्प अधिकारी दुर्गे, मंगेश गवई वाशीम आदींची उपस्थिती होती.

अमरावती विभागीय शाळा पूर्व अभियान मेळावा उत्साहात

विशेष अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मुलांचा विकास हा चांगल्या संस्कारामुळे होतो आणि जिल्हा परिषद शाळा ह्या विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करण्याचे केंद्र आहे. शिक्षकांमुळे  विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते. धकाधकीच्या जीवनात शिक्षकांनी स्वतः फिट राहून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. अध्यक्षीय भाषणात शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांनी विद्यार्थी विकासासाठी या शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले जाते. सर्वांच्या सहकार्य व समन्वयाने कोणतेही कार्य यशस्वी होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात अमरावती विभाग राज्यातून प्रथम आला हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे श्री पटवे यांनी म्हटले.

विद्यार्थी विकासाचे केंद्र

या विभागीय शाळा पूर्व तयारी मेळाव्यात नांदगाव पेठ केंद्रातील उपस्थित प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच कुंकवाचे ताटामध्ये पहिल्या पाऊलाचे ठसे घेण्यात आले. या मेळाव्यात  मराठी व  उर्दू माध्यमांचे शाळा पूर्व तयारी अंतर्गत २१  स्टॉलची उभारणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची नोंदणी करून  शारीरिक विकास, बौध्दीक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी असे विविध कौशल्य तपासण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी हत्तीच्या चित्राच्या सहाय्याने सेल्फी पॉइंट उभारण्यात आले. यावेळी परिसरातील प्रवेश पात्र विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व शिक्षण क्षेत्रातील ईतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिव्याख्याता दीपक चांदुरे, संचालन  विषय साधनव्यक्ती वैशाली वऱ्हाडे तर आभार अमरावती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ अधिव्याखाता पवन मानकर, विजय शिंदे, अधिव्याखाता डॉ.राम सोनारे, डॉ.विकास गावंडे, केंद्रप्रमुख इक्बाल पटेल, दिलीप आठवले, विषय साधनव्यक्ती ममता गुर्जर, नलिनी गोरे, कविता उघडे, छाया मिरासे, अलका लुंगे, अश्विनी पोकळे, उमेश उदापुरे, नाईटेकर, सुवार्ता इंगळे, रावूत, डॉ. प्रवीण राऊत, गोपाल ढवळी, सुवार्ता इंगळे, नांदूरकर, प्रथम संस्थेचे  विभागीय प्रमुख सुनील इंगळे, वैभव निर्मळ, मंगेश ढगे, शुभम देशमुख, सपना चोरे, आदींनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दी समितीचे राजेश सावरकर, विनायक लकडे, श्रीनाथ वानखडे व सचिन वावरकर यांनी कळविले आहे.
शाळा हे विद्यार्थी विकासाचे केंद्र आहे. (Amravati Education) शाळा प्रवेशासाठी शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केल्या जाते. असे मेळावे म्हणजे चिमुकल्या बालगोपालांचा उत्साहाचे उपक्रम असल्याचे प्रतिपादन उद्घाटक तथा अकोला जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी (भा.प्र.से.) यांनी केले.

You Might Also Like

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

TAGGED: Amravati Crime, Amravati Education, Amravati elections, Amravati LokSabha, Amravati Municipality, Amravati news, Amravati police, Divisional Campaign, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
police
Breaking Newsचंद्रपूरविदर्भ

Chandrapur police: पोहणे जीवावर बेतले; दोन चिमुकले तलावात बुडाले

Deshonnati Digital Deshonnati Digital May 7, 2024
PM Kisan Yojana: 25 लाख नवीन शेतकऱ्यांचा ‘या’ योजनेत समावेश; जाणून घ्या…19 वा हप्ता कधी मिळणार?
Maharashtra Elections 2024: ‘तारीख पे तारीख’, संजय राऊत यांनी महाराष्ट्र निवडणुकीत MVA मधील जागावाटपाच्या चर्चेबद्दल टोमणा कोणाला मारला?
Sudhir Mungantiwar: पंतप्रधान यांच्या खुर्चीसाठी चंद्रपुरातून लाकूड रवाना
Washim Tehsildar: खोटी स्वाक्षरीने रॉयल्टीची चोरी; वरीष्ठ अधिकारी करणार काय कारवाई?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भनागपूर

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?