नांदुरा येथील घटना
एक तास जखमी युवक होता पडून
एक तास जखमी युवक होता पडून
अमरावती (Amravati news ) : अमरावती वरून देवरा देवरी कडे जात असतांना नांदुरा किरक्टे जवळ गतिरोधकावरून दुचाकी उसळल्याने दुचाकी चालक युवक गंभीररीत्या जखमी (Amravati Accident) झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. अक्षय अनिल वरघट असे त्या जखमी युवकाचे नाव आहे.अपघातानंतर एक तासापर्यंत अक्षय जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला होता.काही नागरिकांनी १०८ वर कॉल करून देखील तासभर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली नव्हती दरम्यान प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांचे वाहन तेथून जात असल्याने त्यांनी तातडीने खासगी वाहनाद्वारे जखमीला (Amravati Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
१०८ ला कॉल लावूनही पोहचली नाही रुग्णवाहिका
अक्षय वरघट रा.देवरा देवरी (२५) हा युवक त्याच्या दुचाकीने अमरावती वरून गावाकडे जात असतांना नांदुरा किरक्टे या गावाजवळ असलेल्या गरतिरोधकावरून त्याची दुचाकी उसळली. झालेल्या (Amravati Accident) अपघातात अक्षय हा रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. काही नागरिकांनी १०८ वर कॉल करून रुग्णवाहिकेला पाचारण केले मात्र तासभर रुग्णवाहिका पोहचलीच नाही. दरम्यान छोटू महाराज वसू त्याच मार्गाने जात असताना त्यांनी गर्दी पाहून वाहन थांबविले आणि सहकाऱ्यांचा मदतीने जखमीला (Amravati Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.सध्या अक्षयवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
ते गतीरोधक ठरत आहे अपघात केंद्र
नांदुरा नजीक वळणावर असलेल्या त्या गतीरोधकावर पांढरे पट्टे मारले नसल्याने चालकांना गतिरोधक असल्याचे लक्षात येत नाही त्यामुळे या मोठ्या गतिरोधकावरून वाहन उसळून अपघात होण्याच्या अनेक घटना याठिकाणी घडलेल्या आहेत. ते गतिरोधक अपघात केंद्र ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने त्या ठिकाणी पट्टे मारले नाहीत तर मंगळवारी (Construction Department) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा छोटू महाराज वसू यांनी दिला आहे.
शहरातील शेकडो रुग्णवाहिका सुटीवर ?
अपघातग्रस्तांना (Amravati Accident) तातडीने उपचार मिळावा यासाठी शासनाची १०८ ही रुग्णवाहिका सेवेत आहे. टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका (Amravati Hospital) दहा मिनिटात अपघातस्थळी पोहचेल असा दावा शासनाचा आहे मात्र कॉल केल्यानंतर एक तास रुग्णवाहिका आली नसल्यानेशहरातील शेकडो रुग्णवाहिका सुटीवर आहे की काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.