अमरावती (Amravati news) : बडनेरा पोलीस स्टेशन (Badnera Police Station) अंतर्गत तिरुपती नगरमध्ये रविवारच्या पहाटे थरारक घटना घडली. दरोडाच्या प्रयत्नात एक भाजी व्यापारी गंभीररित्या जखमी झाला. या घटनेत तीन बुरखादारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे एक चौथा सहकारी देखील रेकी करताना आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. दरोडाच्या प्रयत्नात जखमी झालेल्या भाजी व्यापाऱ्याचे नाव पंकज रमेश पहूरकर आहे. त्याला (Amravati Hospital) जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन बुरखादारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पोलीस (Amravati police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज आपल्या कुटुंबासोबत तिरुपती नगर बडनेरा मध्ये राहतो. त्याच्या घरात पत्नी, आई आणि वडील मिळून चार सदस्य आहेत. शनिवारच्या पहाटे दोन वाजून 45 मिनिटांनी शेजारच्या जिन्यावरून मागच्या बाजूने त्याच्या घरात तीन बुरखाधारी इसमानी प्रवेश केला. त्यांच्या हातात हातोडी, दोरी आणि चाकू व दरोड्याचे साहित्य होते.
बडनेराच्या तिरुपती नगरमध्ये थरार
आल्याबरोबर त्यांनी पंकज चा गळा दाबला आणि चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधण्याचे प्रयत्न केले. पंकज जेव्हा मदतीसाठी ओरडला तर बुरखाधार्यांनी त्याच्या पोटात चाकू मारला. त्याच वेळेस त्याची पत्नी आणि आई-वडील देखील जागे झाले. परंतु दरोडेखोरांनी त्यांचा सुद्धा गळा दाबला आणि त्यांना जमिनीवर लोटले. आपला दरोड्याचा बेत फसल्याचे पाहून दरोडेखोरांनी आल्यापावली पळाले. या (Amravati Crime) घटनेने खळबळ माजली आहे .माहिती मिळतात (Badnera Police) बडनेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुमित सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सोबत घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करण्यापूर्वी पंकजला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. यासंदर्भात पोलिसांनी कलम 326 ,452 ,323 नुसार गुन्हा नोंदविला आहे .या गुन्ह्यात आणखी काही कलमा समाविष्ट होण्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
चौथा सहकारी करत होता रेकी
पोलिसांनी घटनास्थळावरील (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना तीन बुरखाधारी कॅमेरात आढळून आले. त्यानंतर चौथा सहकारी रेकी करत असल्याचे पोलिसांना शंका आहे. परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा त्या बाजूला नसल्याने तो सीसीटीव्हीत येऊ शकला नाही. पोलिसांनी तत्काळ गांभीर दाखवून गुन्हेगारांचा माग शोधण्यासाठी वेगवेगळे पथक तैयार केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तपासले जात आहे.
सर्व अँगल घेतले तपासात घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार पंकजचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते .त्याची पत्नी सहा ते सात महिन्यात नंतरच त्याला सोडून निघून गेली. दरम्यानच्या काळात परिसरातील एक युवतीचे त्याच्यावर एक तर्फा प्रेम होते. चर्चा अशी आहे की ती पंकजला लग्नाची मागणी देखील घालत होती. त्या पोरीचा पीछा सोडून पंकज बाहेरगावी निघून गेला होता आणि त्याने बाहेरूनच लग्न ऊरकले आणि काही दिवसापूर्वीच बडनेरा तिरुपती नगरला आला होता. भाजीपाल्याचा व्यवसाय करणारा पंकज एक सर्वसामान्य कुटुंबातील मानला जातो, त्यामुळे हा दरोडाचा प्रयत्न की हत्याचा प्रयत्न (Amravati Crime), अशी चर्चा घटनास्थळावर ऐकायला मिळाली.पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपासाला सुरुवात केली आहे.