अमरावती (Amravati Road ) : स्वातंत्र्याला सत्तर वर्ष होऊनही अजून ग्रामीण रस्त्याची व्यथा संपत नसल्याची चिन्हे दिसत नाही. अमरावती तालुक्यातील अंतोरा ते चिंचोली काळे गावापर्यंत पांदन रस्ता आहे. जिल्ह्यातील अनेक गावात पांदण रस्त्याची कामे झाले पण हा रस्ता अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या (Amravati Road) रस्त्यावर गावातील सुमारे पाचशे एकर जमीन आहे. परंतु रस्त्याअभवी येथील शेतकरी त्रस्त असून शेतीच्या मशागतीची कामे खराब रस्त्या मूळे वेळेवर होऊ शकत नाही. या रस्त्यावर पावसाने चिखल होत असल्यामुळें पायी चालणेही दुरापस्त आहे.
शेतमजूर या रस्त्यामुळे शेतात काम करणे टाळतात. शेतीच्या पिकाची काढणी साठी मशीन जाणे कठीण असते. वेळेवर पिकाची काढणी न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होतो. या गावातील शेतकऱ्यांचा चांदुर बाजार ही महत्वाची बाजार पेठ आहे. कमी अंतर असल्यामुळें या मार्गे अंतीरा z सावंगा, देवरा देवरी येथील शेतकरी चंदुर बाजार येत जात असतात परंतु पावसाळी काळात हा मार्ग पूर्णत बंद असतो. (Amravati Road) वीस वर्षापूर्वी अंटोरा येथील हायस्कूल मध्ये चिंचोली काळे येथील विदयार्थी शाळेत शिकायला येत होते.
परंतु खराब रस्त्यांमुळे आता विदयार्थी शाळेत दाखल होत नाही. त्यामुळे अंतिरा येथिल हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर आहे. देशातील विकास हा रस्त्यावर अवलंबून असतो. त्यासाठी देशात विविध प्रकल्प राबवून मोठे मोठे रस्ते निर्माण होत आहे. परंतु ग्रामिल शेती अर्थ व्यवस्था ही खेडी जोडणारी आणि शेती पांदण रस्ते झाल्याशिवाय पुढे येऊ शकणार नाही. पण नेते आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्ते पणा मूळे हे रस्ते अजूनही दुरवस्थ आहेत. या (Amravati Road) रस्त्याच्या मागणी साठी अनेक वेळा निवेदन दिले पण त्याला कचऱ्याची टोपली दाखवली गेली. परंतु आता हा रस्ता मंजूर न झाल्यास येथील ग्रामस्थांनी येत्या अधिवेशन काळात आंदोलन करून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.