अमरावती (Amravati share market) : शेअर मार्केट (share market) त्याचप्रमाणे क्रिप्टो करन्सीद्वारे (Crypto Currency) फसवणूक करणाऱ्या टोळीतील 5 जणांना अटक करण्यात अमरावती सायबर पोलिसांच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपींनी नफा मिळवून देण्याच्या नावाखाली 1 कोटी 77 हजार 824 रुपये येथून हस्तांतरित करून फसवणूक केली होती. चेकबुक, एटीएम स्टॅम्प आदी अनेक साहित्यासह ७ लाख ४५ हजार ९११ रुपये पोलिसांनी गोठवले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अशी माहिती (Amravati Police) पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आंतरराज्य टोळीतील ५ आरोपींना अटक
शुभम नागेशराव गुलये 23, (Zilla Parishad) जिल्हा परिषद कॉलनीच्या मागे, म्हाडा कॉलनी, अकोला), गौरव शांतीलाल अग्रवाल, (23 रिंगरोड, निम्मे नगर, कौलखेड अकोला), रवी रामसुभाष मौर्य, (33) जाजू नगर, कौलखेड रोड, हिगन्ना फाटा अकोला), नमन गजानन डहाके (23, रिंगरोड, निम्मे नगर, कोळखेड अकोला), आणि एक अशी महिला असे अटक आरोपींची नावे आहेत. पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, 27 जून रोजी फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला वियाका एप वरून आमिष दाखवून तिच्या मोबाईलवर शेअर (share market) केले. बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या व्हॉट्सॲप मोबाईल नंबरवरून तिला मेसेज आरोपी पाठवत होते. आणि तक्रारदाराच्या व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून त्यावर क्लिक करून वायाका एक्सचेंज नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्यावर पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगून तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली.
यासह शेअर मार्केट (share market) आणि क्रिप्टो करन्सीमध्ये (Crypto Currency) नफा कमावण्याच्या नावाखाली सत्तर हजार आठशे चोवीस रुपयांची रक्कम हस्तांतरित करून तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली. महिलेच्या तक्रारीच्या आधारावरून (Amravati Police) पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाय, आरोपी जवळून 42,82,824 रु रोख,14 बँक खाती, कोटक महिंद्रा बँक, गुजरात बंधन बँक, हैदराबाद फेडरल बँक, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा आणि उर्वरित बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या रकमेपैकी उर्वरित रक्कम 216 बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले असून आतापर्यंत 7,45,911 रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या खात्यातील रक्कम गोठवण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली (Amravati Police) पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, पो.नि. कल्याणी हुमणे, अनिकेत कासार, शैलेंद्र अर्दक, पंकज गाडे, उल्हास टवलारे, सुधीर चर्जन, अपर्णा बंदे, प्रशांत मोहोड, सचिन भोयर, अनिकेत वानखडे, सुषमा आठवले आदींनी ही कारवाई केली.