परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांचे आश्वासन
अमरावती (Amravati Transport Department) : नव्याने तयार झालेल्या आकृतीबंधामध्ये कर्मचाऱ्यांचे काही पदे कमी झाल्याने त्या कर्मचाऱ्यांचे परिवहन विभागातच इतर जिल्ह्यामध्ये समायोजन करण्यात आले. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या नावांचा क्रम चुकीने खालीवर झाला असल्यास त्याची दुरुस्ती करण्यात येवून नव्याने आदेश काढण्यात येईल, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी आश्वाशित केले. (Transport Department) मोटार वाहन कर्मचारी संघटनेच्या (आरटीओ) पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी आश्वासित केले आहे.
राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी शुक्रवारी (दि. ३०) येथील प्रादेशिक (Transport Department) परिवहन कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यभर कर्मचाऱ्यांचे चुकीच्या पध्दतीने समायोजन झाले असल्याची बाब मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. समायोजनाबाबत कर्मचाऱ्यांची हरकत नाही, परंतु विहित पध्दतीने व नियमानुसार समायोजन होणे आवश्यक असल्याचे संघटनेचे नेते अनिल मानकर यांचे म्हणने आहे.
चुकीच्या पध्दतीने अमरावती विभागातून (Transport Department) समायोजन झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत त्यांनी परिवहन आयुक्त यांच्यासमोर सादर केला, त्यावेळी कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. याबाबत परिवहन आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले. समायोजनाच्या कुठल्याही नियमाचे पालन न केल्याने कर्मचाऱ्यांना अखेर प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे (मॅट) धाव घेऊन स्टे मिळवला.
यामध्ये कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले, याला जबाबदार कोण असा प्रश्न अनिल मानकर यांनी (Transport Department) परिवहन आयुक्त भिमनवार यांच्यासमोर उपस्थित केला व संपूर्ण राज्यभर कर्मचाऱ्यांमध्ये याबाबतीत संताप व्यक्त करण्यात येत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे विजय गावंडे, अक्षय राठोड, साजिद अली, जयसिंग राठोड, अरुण वाघमारे, श्वेता वैद्य, संगीता भिलावेकर, मीनल गिरे, रोहिणी दातार, समीक्षा वारकरी, दीपा पाथरे, रश्मी सोनार, दिपाली गवळी, प्रीती मेहेत्रे, श्रीकांत शिरे,अनिल मेश्राम, शीला मोरे आदी कर्मचारी उपस्थित होते.