संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
अमरावती (Amravati University) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. महेंद्र पुंडलिकराव ढोरे (Dr. Mahendra Dhore), प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर यांची आज निवड करण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक (University Act) विद्यापीठ कायदा 2016 च्या कलम 13 (6) नुसार विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केलेल्या शिफारसीनुसार (Amravati University) विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. महेंद्र ढोरे (Dr. Mahendra Dhore) यांची निवड करण्याचा आज निर्णय घेतला.
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने घेतला निर्णय
याबाबत विद्यापीठ प्रशासनाने दिनांक 14 जून 2024 रोजी नियुक्तीचा कार्यालयीन आदेश निर्गमित केला आहे. डॉ. महेंद्र ढोरे (Dr. Mahendra Dhore) यांच्या प्र-कलगुरू पदाचा कार्यकाळ हा विद्यमान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या कार्यकाळात सोबत असणार आहे. संत गाडगे बाबा (Amravati University) अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. महेंद्र ढोरे (Dr. Mahendra Dhore) यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, कुलसचिव मंगेश वरखडे, प्र-कुलगुरु डॉ. प्रसाद वाडेगावकर, विविध प्राधिकारणींचे सदस्य, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.