माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन
अमरावती (Amravati Vipassana Center) : मनःशांती आणि ध्यानसाधनेसाठी विपश्यना खूप गरजेचे आहे.राज्यातील निवडक ठिकाणी (Vipassana Center) विपश्यना केंद्र असून त्याठिकाणी साधकांना प्रतीक्षा करावी लागते. अमरावती जिल्ह्यातील विपश्यना केंद्र देशातील आणि देशाबाहेरील साधकांसाठी पर्वणी ठरणारे आहे याठिकाणी असलेली वास्तू, नैसर्गिक सौंदर्य साधकांना ध्यानसाधनेसाठी उपयुक्त ठरणार असून हे विपश्यना केंद्र लवकरच जागतिक स्तरावर ओळख निर्माण करेल असा आशावाद राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले (Rajkumar Badole) यांनी अडगाव खुर्द येथील(Vipassana Center) विपश्यना केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.
विपश्यना केंद्राचे थाटात लोकार्पण
सामाजिक न्याय दिवसानिमित्य बुधवारी धम्मशांती विपश्यना केंद्राचे माजी मंत्री राजकुमार बडोले (Rajkumar Badole) यांच्या हस्ते थाटात लोकार्पण झाले.यावेळी या (Vipassana Center) विपश्यना केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला भदंत सत्यानंद महास्थवीर, भदंत चंद्रमणी थेरो , भदंत बुद्धघोष महाथेरो, भदंत आनंद महास्थवीर, भदंत अमोल बोधी या भन्तेजींची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, गोविंद कासट, काठोडे सर,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, ॲड. वसंतराव गवई , प्रा.दिनकर तुरकाने, राहुल मेश्राम,इंजि. संजय थोरात, धनंजय गुडदेकर, एस.यु. फुलझले, प्रा.संजय शेंडे,सुभेदार अविनाश गायकवाड, सतीश नाईक, दिलीप बागडे, सुखदेवराव ढोके, दीपक सवाई, अडगाव येथील सरपंच साधना इंगोले, पोलीस पाटील सोनू गणवीर, अविनाश मार्डीकर,अतुल रामटेके, अनिल बागडे, , मनोज गजभिये, शिवा प्रधान, ओंकारराव वानखडे , वासनकर साहेब, बी. आर .धाकडे, भारत राऊत, शाम मोरे, पी.एस.आय .मोरे, मंदाकिनी बागडे,सिद्धार्थ शेंडे,एस, आर, कोंडे, कपिल रामटेके,मंगेश डोंगरे, राजाभाऊ गुडघे, किरण गुडदे ,बंटी रामटेके , सुनील रामटेके , रितेश तेलमोरे, जानराव वानखडे, मालती यावले,मंगेश मनोहरे,पप्पू देशमुख , संजय बनसोड, मदन गायकवाड, किशोर सरदार ,रेश्मा सरदार, सुभाष वानखेडे यांच्यासह मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
ऑस्ट्रेलिया येथील भन्तेजींसह मान्यवरांची उपस्थिती
सर्वप्रथम भंतेजींच्या हस्ते बुद्धगया येथून आणलेले बोधी वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनतर परित्राणपाठ करून तसेच फित कापुन उदघाटन सोहळा पार पडला. धम्मशांती विपश्यना केंद्र,अमरावती हे भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना संस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेले (Vipassana Center) विपश्यना केंद्र विदर्भासह राज्यातील साधकांना धम्मसाधना करण्यासाठी हे विपश्यना केंद्र अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. समाजकल्याण विभाग यांच्या सहकार्याने तसेच लोकवर्गणीतुन या विपश्यना केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.
या उदघाटन सोहळ्याला संपूर्ण विदर्भातून अनुयायी उपस्थित झाले होते.अत्यंत नियोजनबद्ध पार पडलेल्या या कार्यक्रमाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. धम्मशांती विपश्यना केंद्राचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे यांच्या संकल्पनेतुन निर्माण झालेल्या या भव्यदिव्य वास्तूचे अनेकांनी कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मशांती विपश्यना केंद्र, अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे ,किशोर सरदार, कपिल धवणे ,शिवा प्रधान, सुभाष गडलिंग, राजेंद्र नितनवरे, बि.आर. धाकडे ,विजय कांबळे, प्रकाश ढोणे ,प्रशांत तायडे,राहुल डोंगरे ,मंगेश डोंगरे, राज वाहने, सतीश नाईक,शरद गंभीर,नाजूकराव ढोके यांचेसह जिल्ह्यातील सर्व महिला मंडळ ,उपासिका संघ यांनी मोलाचे परिश्रम घेतले.