पोलीस आयुक्तांना दिले निवेदन
अमरावती (Amravati Youth Congress) : गेल्या महिन्याभरात अमरावती शहरांमध्ये सात हत्या आणि (Amravati Youth Congress) मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया झालेल्या आहेत. त्यापैकी पाच हत्या तर ३६ तासांच्या कालावधीत घडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात MD ड्रग व इतर अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई गुंतलेली आहे. त्याच बरोबर या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग ही तर अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. त्याच्यासोबतच मोठ्या प्रमाणात जातीय तणाव, धार्मिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत.
एकंदरीतच शहरातील शांतता,सामाजिक सौहार्द, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली असल्याची सार्वत्रिक भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. (Amravati Youth Congress) अमरावती शहर विदर्भाचे क्राईम कॅपिटल म्हणून उदयास येत आहे. आणि अशा या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये प्रशासनाचे अस्तित्व कुठेही दिसत नसल्याची सुद्धा भावना नागरिकांमध्ये आहे. वाढत्या गुन्हेगारीचे संघटीकरण होत आहे की काय आणि या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले अग्रेसर असून त्यांच्यावर प्रशासनाचा वा (Amravati Police) पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे जळजळीत वास्तव युवक कॅांग्रेसने निदर्शनास आणून दिले . या सर्व घटनांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्र हे चायना चाकू असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
अशी घातक शस्त्रे सहजासहजी गुन्हेगारांना उपलब्ध होणे हे सुद्धा अत्यंत चिंतेची बाब आहे. घटना घडल्यानंतर त्यानंतर पोलिसातर्फे कारवाई केल्या जाते परंतु काही घटनांमध्ये पोलिसांपर्यंत (Amravati Police) तक्रारी येऊन सुद्धा त्याची योग्य वेळी दखल न घेतल्यामुळे त्याचे पर्यावसन पुढे हत्या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये झाल्याचे एव्हाना लक्षात आलेले आहेत. तरी अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता यापेक्षाही अधिक ऍक्टिव्ह पोलिसिंगची गरज असल्याचे या निवेदनाच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अमरावती शहर हे सातत्याने एका शांततावादी शहरांमध्ये गणना होणारे शहर आहे. परंतु गत काही काळात अमरावती शहराच्या या ओळखीला नख लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. तरी उपरोक्त या सर्व मुद्द्यांचे संज्ञान घेऊन उचित कार्यवाही करावी अशी या निवेदनाद्वारे युवक कॅांग्रेसद्वारे आम्ही मागणी करण्यात आली.
यावेळी अमरावती विधानसभा (Amravati Youth Congress) युवक कॅांग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, औद्योगिक सेल अध्यक्ष समीर जवंजाळ, जिल्हा युकॅा उपाध्यक्ष अनिकेत ढेंगळे, अक्षय साबळे, कामगार सेल अध्यक्ष राहूल वानखडे, एनएसयुआय अध्यक्ष संकेत साहू, ब्लॅाक अध्यक्ष आकाश धुराटकर, शुभम बांबल, प्रतिक गजभिये, रोशन इंगळे, आशिष चौहान, कृणाल गावंडे, मोहीत भेंडे, सुशील वानखडे, अमोल राऊत, मोहीत भेंडे, केदार भेंडे, सुजल इंगळे, श्रेयस धर्माळे, आकाश गेडाम, धनंजय बोबडे, धम्मा मोहोड, अभिषेक भोसले, साहिल वानरे, निशांत पवार व इतर युवक कॅांग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.