परभणी (Parbhani):- जिल्ह्यात आता पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पाऊस (Rain)पडत आहे. शुक्रवार १६ जुलै रोजी जिल्ह्यात १८.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद (note)झाली. अद्यापही वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर अपेक्षित पाऊस पडला नाही. जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नदी- नाले ओसंडून वाहत आहेत. १ जून ते २६ जुलै या दरम्यान जिल्ह्यात सर्वसाधारण ३२१.५ मिमी एवढा पाऊस होतो. मात्र प्रत्यक्षात ३१३.९ मिमी एवढा पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत सदरचे प्रमाण थोडे कमी आहे.