परभणी (Parbhani):- तालुक्यातील पेगरगव्हाण येथे एका हिंस्त्र प्राण्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना मंगळवार १६ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. शेत शिवारात प्राण्याच्या पायाचे ठसे (footprints)आढळून आले आहेत. सदर हिंस्त्र प्राणी बिबट्या असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. किशन गणपतराव ईखे यांची गट क्रमांक १५७ मध्ये शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात गाय बांधलेली होती. सदर गाय अज्ञात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मयत झाली. या घटनेत शेतकर्याचे जवळपास ३५ हजार रुपयांचे नुकसान (damage) झाले आहे. ही घटना १६ जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. महसूल प्रशासनाच्या वतीने तलाठ्यांनी १७ जुलै रोजी सकाळी पंचनामा केला. पेगरगव्हाण आणि भोसा शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वावर वाढला असून शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण; हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करावा
भोसा शिवारात या हिंस्त्र प्राण्याने एका हरणाचा फडशा पाडल्याची माहिती मिळाली आहे. सदर हिंस्त्र प्राण्याने हरणाला ऊसाच्या शेतामध्ये ओढत नेले. हिंस्त्र प्राण्याच्या वावरामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वन विभागाने(Forest Department) सदर हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पशुपालक, शेतकर्यांमधून होत आहे.