परभणी(Parbhani) :- बालसुधार गृहात राहुन शैक्षणिक क्षमतेच्या जोरावर अनाथ असलेल्या गणेश आडवालने तलाठी (Talathi)पदाला गवसनी घातली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील एरंडेश्वर येथील गणेश आडवाल हा अनाथ असून परभणी येथील लक्ष्मी प्रतिष्ठाण संचलित मुलांचे बालगृहात प्रवेशित असून त्याने इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण येथे घेतले. पुढील शिक्षणासाठी पुणे येथील अनुरक्षण बालगृहात राहून आयटीआय आणि त्यानंतर बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
शैक्षणिक क्षमतेच्या जोरावर मिळवले यश
नंतर स्पर्धा परीक्षा (स्पर्धा परीक्षा ) तयारी करत राज्य शासनाच्या महसुल विभागातील महत्वाच्या अशा तलाठी परीक्षेत यश मिळविले आहे. गणेश आडवाल याची बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात नियुक्ती (appointment) झाली आहे. या यशाबद्दल त्याचे कृषि मंडळ(Board of Agriculture) अधिकारी मंचक साळवे, बालगृहाचे समुपदेशक सोपान पतंगे, देशमुख, निरीक्षणगृहाचे सुरेश वाघमारे यांनी बालसुधारगृहाच्या (Children’s Home) वतीने गणेश आडवालचा सत्कार केला. या यशाबद्दल गणेश आडवालचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.