– मृतकामध्ये पिता आणि पुत्राचा समावेश, मृतक तोंडाखैरी गावातील
कळमेश्वर (Nagpur) : कळमेश्वर तोंडाखैरी मार्गावर (Kalameshwar Road) गोवरी नदीच्या (Gowari River) काठावर आंजनाच्या झाडाला धडक देऊन (Car Accident) अनियंत्रित कार नदीत कोसळल्याने चालकासह आणि एक जण जागीच ठार झाला. तर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एक जण गंभीर जखमी होऊन नदीच्या काठावर असलेल्या झाडाला लटकून राहिल्याने तो बचावला. ही घटना मध्यरात्री बारा वाजता दरम्यान घडली. रवींद्र भैय्याजी टाले वय 33 वर्षे , भैय्याजी टाले वय 65 वर्ष दोघेही राहणार तोंडाखैरी अशी मृतकाची नावे असून, राहुल डोमके वय 35 वर्ष राहणार तोंडाखैरी तालुका कळमेश्वर (Kalameshwar Road) असे गंभीर जखमी चे नाव आहे.
माहितीनुसार, दिनांक 26 एप्रिल रोजी भैय्याजी टाले हे कळमेश्वर शहरात (Kalameshwar Road) रथयात्रा निमित्त सुरू असलेला दुय्यम खडा तमाशा बघण्याकरिता आले होते. रात्री उशिरापर्यंत वडील घरी न आल्याने त्यांचा मुलगा रवींद्र टाले, हा त्याचा मित्र राहुल डोमके याच्यासह हुंडाई कंपनीची वरणा कारने कळमेश्वरला आला होता. वडिल भैय्याजी टाले यांना घेऊन मध्यरात्री बारा वाजता दरम्यान तोंडाखैरी गावाकडे जात असताना गोवरी गावाच्या शिवारात गोवरी नदी पात्रालगत असलेल्या अंजनाच्या झाडाला धडक देऊन, (Car Accident) कार अनियंत्रित झाली व सरळ नदीपात्रात जाऊन कोसळली .
या (Car Accident) अपघातात रवींद्र टाले व त्याचे वडील भैय्याजी टाले हे जागीच मरण पावले. मागे बसलेला राहुल डोमके हा गाडीची काच फुटल्याने पात्रालगत असलेल्या झाडावरची फांदी पकडून रात्रभर गंभीर जखमी अवस्थेत लटकलेला होता. सकाळी गावकरी फिरायला निघाले असता त्यांना हा अपघात दिसून आला. गोवरीचे पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती (Kalameshwar Police) पोलीस स्टेशन कळमेश्वर यांना दिली. घटनेची गांभीर्या बघता कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश कामाले, पोलीस उपनिरीक्षक मनोज टिपले, पोलीस हवालदार अंकुश लाखे, पोलीस नायक अनिस शेख यांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून नदीमध्ये अर्धवट बुडालेली कार व त्यातील मृतदेह बाहेर काढले. त्यांना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमीवर नागपूर येथे वीम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे, (Kalameshwar Police) कळमेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार योगेश कामाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.