विविध दुर्धर आजारावरील तपासण्या करून तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
अमरावती (Anandavan Exchange Conference) : स्थानिक प्रसुतीशास्त्र व (Gynecology Institute) स्त्रीरोग संस्थेच्यावतीने वरोरा येथील महारोगी सेवा समिती आनंदवन (Anandavan) येथे ‘एक्सचेज कॉन्फरन्स’ (Exchange Conference) या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. २० व २१ जुलै २०२४ या कालावधीत पार पडलेल्या परिषदेत आनंदवनातील अंध, अपंग तसेच विविध दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांशी संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांनी संवाद साधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
विविध सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या अमरावती येथील प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग संस्थेच्यावतीने २० व २१ जुलै २०२४ रोजी आनंदवनातील (Anandavan) अंध, अपंग तसेच विविध दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘एक्सचेज कॉन्फरन्स’या (Exchange Conference) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या पुणे व चंद्रपूर शाखेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला समाजसेवक डॉ. विकास आमटे व डॉ. पल्लवीताई आमटे, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग संस्था पुणेच्या अध्यक्ष डॉ. आरती लिमकर, सचिव डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. अमोल लुंकड, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. मीनाक्षी घाटे, सचिव डॉ. मनीषा वसादे, डॉ. कीर्ती साने, प्रसूतीशास्त्र व स्त्री रोग संस्था अमरावतीचे अध्यक्ष डॉ. रश्मी खार, सचिव डॉ. मनाली ढोले यांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांनी आनंदवनातील अंध, अपंग व्यक्तीच्या तसेच महिलांच्या गर्भाशय कॅन्सर यासारख्या आजारावरील तपासण्या करून त्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर आनंदवनात वास्तव्यास असलेल्या अंध, अपंग कलाकारांनी उपस्थितांसमोर आर्केस्ट्रा सादर करून त्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी समाजसेवक डॉ. विकास आमटे व डॉ. पल्लवीताई आमटे यांनी आपल्या मनोगतातून आनंदवनात (Anandavan) अव्याहतपणे सुरू असलेल्या रुग्णसेवेची माहिती दिली. यावेळी तज्ञ डॉक्टरांमध्ये डॉ. मोनाली ढोले, डॉ. पुष्पा जुनघरे, डॉ. मिनल देशमुख, डॉ. निधी सोनोने, डॉ. शलका बारी, डॉ. नीलिमा अरडक, डॉ. आरती मूरके, डॉ. उज्वला गुल्हाने, डॉ. वनिता गावंडे, डॉ. रश्मी कहार, डॉ. रेवती ढवळे, डॉ. वासंती कडू आदींचा सहभाग होता.