वरोऱ्याच्या पोलीस कोठडीत आरोपीने केली आत्महत्या
वरोरा (Anandavan murder Case) : वरोरा तालुक्यात आनंदवन परिसरात युवतीची हत्या (Anandavan murder Case) २६ जुन रोजी झाली होती. तिचा प्रियकर प्रकरणातील आरोपी समाधान माळी याला अटक करण्यात आली होती. सदर आरोपीने (Varora Police) वरोरा पोलिस कस्टडीमध्ये आज आत्महत्या (Varora Crime) केली असून, शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. 26/6/2024 ला आनंदवन वरोरा परिसर येथे आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 वर्ष राहणार वरोरा तिचा खून झाला होता.
बुटाच्या लेसने लावला गळफास
अपराध क्रमांक 518 पब्लिक 2024 कलम 302 भादवी नुसार गुन्हा (Varora Crime) दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपी समाधान माळी वय 26 वर्ष हा पोलिसांचा अटकेत होता. आज पहाटे दिनांक 30/ 6/ 2024 ला पोलिस कस्टडी मध्ये जोड्याचा लेसने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास (Varora Police) वरोरा पोलीस करत आहेत.