काळीमाती धम्मकुटी येथे अनंत पोर्णिमा वर्षावास थाटात संपन्न
अर्जुनी मोर. (Ananth Poornima) : बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे. सधम्म आचरण केल्याने खराबुद्ध धम्म कळतो, धम्म हा सांगण्यापेक्षा आचरणातून सिद्ध करायचा आहे, मज्झिम निकायातील दक्षिणा विभंगसुत्तात महाप्रजापती गौतमी तीनदा बुद्धाला चीवरदान स्वीकारायला विनंती करते, तेव्हा बुद्ध संघाला अर्पण करायला सांगतात. तेव्हा आनंद बुद्धाला महाप्रजापतीने संगोपन केल्याचे उपकार स्मरणात आणून देतात. बुद्ध सांगतात ज्या व्यक्तीकडून बुद्ध धम्म, संघाची शरण, पंचशील, आर्यअष्टांगिक मार्ग मिळतो त्या व्यक्तीचे उपकार कोणत्याच प्रकारे फेडल्या जाऊ शकत नाही. असे फेडल्यास कठीण उपकार बाबासाहेबांनी आपल्यावर केले त्याच धम्म चे पालन करण्याची प्रेरणा घेण्यासाठी अशा वर्वाषासाची आज नितांत गरज आहे. बुध्द हे चमत्कारी नसुन विज्ञानवादी मार्गदाता आहेत.बुध्दधम्माचे आचरण म्हणजे प्रगतीचा मार्ग आहे.त्यामुळे बुध्दाला शोधायचे असेल तर आपल्या शरीरात शोधावे लागेल असे मौलीक विचार अरुणाचल प्रदेशचे पुज्य भंते वण्णासामी महाथेरो यांनी व्यक्त केले.
पुर्व विदर्भातील हजारो उपासक उपासीका उपस्थीत
निसर्गरम्य परिसर पवित्रधम्मभुमी काळीमाती ता.अर्जुनी मोर.येथे 17,व 18 सप्टेंबर ला आयोजित भाद्रपद (Ananth Poornima) अनंत पोर्णिमा( वर्षावास) निमित्त धम्मदेशना कार्यक्रमात उपस्थीत हजारो बौध्द उपासक,उपासिका यांना धम्मप्रवचन करतांना ते बोलत होते. यावेळी भंते नंद थेरो काळीमाती, भंते आनंद थेरो,भंतेे रतनसार थेरो,भंते पय्यारतन थेरो,भंते सुमेधो नागरतन, व अन्य ठिकाणचे भंते प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून पवित्रधम्मभुमी काळीमाती ता अर्जुनी मोर. येथे वर्षावास (Ananth Poornima) कार्यक्रम आयोजित केला जातो. 17 व 18 सप्टेंबर ला समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. 17 सप्टेंबर ला रात्री 7 ते 8 वाजता बुध्दवंदना, रात्रौ 10 वाजता भिक्खुसंघ व उपासक उपासीकां तर्फे विशाल धम्मरॅली काढण्यात आली.भिक्खुसंघाचे स्वागतानंतर रात्रभर महापरित्रण पाठ घेण्यात आले. यावेळी विविध बौध्द भिक्खुंनी बुध्दाचा धम्म आपल्या प्रवचनातुन पटवुन दिला. रात्रौच्या कार्यक्रमाला माजी मंत्री राजकुमार बडोले, डाॅ. सुगत चंद्रिकापुरे, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, सामाजीक कार्यकर्ते डाॅ. भारत लाडे, नगरसेवक तथा युवा सामाजीक कार्यकर्ते दानेश साखरे,माजी आमदार दिलीप बन्सोड,रत्नदिप दहीवले, व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहुन महापरित्रण पाठाचा लाभ घेतला.
यावेळी हजारो उपस्थित बौध्द बांधवासाठी रात्रौच्या भोजनाची व्यवस्था डाॅ. सुगत चंद्रिकापुरे यांचे वतीने करण्यात आली. 18 सप्टेंबर ला सकाळी 6:30 वाजता धम्म ध्वजारोहन, 8 वाजता धम्मदेशना, भोजनदान,व संघदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित बौध्द भंतेंना चिवरदान व धम्म दान देण्यात आले. दोन दिवसीय या धम्म कार्यक्रमाला भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, नागपुर, अकोला, वर्धा व पुर्व विदर्भातील हजारो उपासक उपासीका उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकट खोब्रागडे, हिरकचंद टेभुर्णे, नरेश खोब्रागडे, सरपंच मोहण साखरे व चमु, नाना शहारे ,प्रशांत टेभुर्णे, सुरेखा टेभुर्णे, नलीनी शहारे, ओमिता साखरे, विशाल टेभुर्णे, सुभाष लाडे, अजय टेभुंर्णे,गौतम शहारे, रवि शहारे, समितीचे सुखलाल रामटेके, दयाराम भालाधरे, नाना शहारे, यशवंत गणवीर, रत्नदिप दहिवले, अशोक लांजेवार, संतोष मेश्राम, ताराचंद नंदेश्वर, सविता लाडे, रमा डोंगरवार, कविता शहारे, डाॅ. अजय अंबादे, विष्णु कोटांगले व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी चार हजाराचे वरुन उपासक उपासीका यांनी सहभागी होवुन धम्म भोजनाचा लाभ घेतला.