भाजप जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; रॅलीत गर्दीचा उच्चांक
रिसोड (Anantrao Deshmukh) : माजी मंत्री माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांनी आज रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठीच्या प्रसंगी निघालेल्या रॅलीत रिसोड मालेगाव मतदार संघातील गाव खेड्यातून अतिशय मोठ्या संख्येने गोरगरीब, जनसामान्य महिला, व्यापारी, शेतकरी कष्टकरी, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संत अमरदास बाबा संस्थान मंदिर परिसरात प्रथमता सभा संपन्न झाली यावेळी मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले.
यावेळी अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादाने संधी मिळाल्यास या मतदारसंघाचा कायापालट करणार असून एक आमदार समाजातील सर्व घटकांसाठी कामे करून आणि भरघोस विकास कसा करू शकतो याचे उदाहरण राज्यातील जनतेसमोर उभे करणार यासाठी सर्व मायबाप जनतेचे आशीर्वाद आवश्यक आहेत.असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आशिर्वाद मागितले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्याम बढे, बाळासाहेब खरात, गजाननराव लाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या सभेनंतर निघालेल्या रॅलीत गर्दीचा उच्चांक गाठला.
या रॅलीत रिसोड मालेगाव विधानसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व गाव व शहरांमधून मोठ्या संख्येने गोरगरीब जनसामान्य व्यापारी शेतकरी कष्टकरी महिला युवक ज्येष्ठ सहभागी झाले होते. सदर रॅली सुरू झाली त्या स्थळावरून रिसोड तहसील पर्यंत हजारोच्या संख्येने लोक रॅलीत होते ही रॅली सभास्थळापासून सुरुवात झाली ते तहसील पर्यंत लोक होते. यानंतर माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बाळासाहेब खरात,जिल्हाध्यक्ष शाम बढे, गोपाल पाटील राऊत, गजाननराव लाटे,गजाननराव देवळे यांची उपस्थिती होती यावेळी अनंतराव देशमुख यांनी अर्ज सादर केला. तसेच बाहेर येऊन अतिशय मोठ्या संख्येने गर्दीचा उच्चांक गाठलेल्या या रॅलीत सहभागी झालेल्या सर्व उपस्थित महिला भगिनी शेतकरी कष्टकरी जनसामान्य गोरगरीब व्यापारी यांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्वांशी संवाद साधला.
रॅली दरम्यान माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh),भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांनी उपस्थित राहून सर्वांचे आशीर्वाद घेतले यावेळी रस्त्याच्या दुतर्फा अनंतराव देशमुख, ॲड. नकुल देशमुख यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी युवक व जेष्ठ सहभागी झाले होते. दरम्यान अनंतराव देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज मुळे आणि त्यांच्या नामांकन भरण्याच्या रॅलीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या लोकांमुळे त्यांच्या समर्थक,चाहते,स्नेही मंडळी,पदाधिकारी,यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
माझा उमेदवारी अर्ज पक्षाच्या आदेशानुसारच
मी रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातून पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसारच उमेदवारी अर्ज दाखल केला असून मी पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचे पालन करीत आहे पक्ष्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार रिसोड मालेगाव मतदार संघात भाजपाकडून उमेदवारी दाखल केली असून कोणत्याही प्रकारची बंडखोरी करणार नाही असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.