हिंगोली (MLA Santosh Bangar) : एकीकडे नागपूर येथे राज्यमंत्री मंडळाचा मंत्री मंडळ विस्तार रविवारी सुरू असताना हिंगोलीत आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासह पाणीपुरीवर ताव मारला.
१५ डिसेंबर रविवार रोजी नागपुर येथे अधिवेशन कालावधीत मंत्री मंडळाचा विस्तार झाला. परंतु आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) हे मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त हिंगोलीत उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास शासकीय विश्रामगृह परिसरात आले असता त्यांना पाणीपुरीचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरीवर ताव मारला. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव नाईक आदींची उपस्थिती होती.