परभणी(Parbhani):- जिल्हा स्त्री रुग्णालयात असणार्या नवजात शिशू विभागात(Infant section) ठेवण्यात आलेल्या दानपेटी वर याच विभागात काम करणार्या दोन महिला डॉक्टरांनी (Doctors)डल्ला मारल्याची घटना रविवार २६ मे रोजी घडली असून सदरील लाजिरवाणा संपूर्ण प्रकार हा येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV)कॅमेर्यात कैद झाला असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली.याबाबत येथील वैद्यकीय अधीक्षकांनीही याला दुजोरा दिला आहे.
घटना सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद; वैद्यकीय अधिक्षकांनी दिला दुजोरा
परभणीतील जिल्हा स्त्री रुग्णालयात(Women’s Hospital) असणार्या नवजात शिशू विभाग हा पहिल्या मजल्यावर आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून गरोदर माता प्रसूती (childbirth) करिता येथे दाखल होतात. प्रसूती झाल्यानंतर ज्या नवजात बालकाची पूर्ण पणे वाढ झाली नाही त्या बालकांना या विभागात दाखल करतात. नवजात बालकांचा येथे योग्य उपचार झाल्यानंतर येथे ठेवण्यात आलेल्या दानपेटीत नवजात बालकांचे पालक स्वखुशीने (willingly) दान करतात. या दानपेटीत जमा झालेल्या पैशातून रुग्णालयातीलच बालकांना किंवा त्यांच्या मातांना उपयोगी येईल असे साहित्य मोफत दिले जाते. मात्र या विभागात रविवार २६ मे रोजी च्या मध्यरात्री लाजिरवाणा प्रकार घडला असून येथीलच दोन महिला डॉक्टरांनी दानपेटीवर डल्ला मारत दानपेटीतील सर्व रोकड लंपास केली असल्याचा प्रकार घडला असून सदरील संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. व अशी चर्चाही रुग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली. याबाबत दूरध्वनी(Telephone) वरून वैद्यकीय(Medical) अधीक्षकांना माहिती विचारली असता त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या गंभीर प्रकरणामुळे मात्र रुग्णालयाची प्रतिमा पूर्णतः मलिन झाली आहे.
रात्रीच्या वेळी मद्यपान चालत असल्याचीही चर्चा….
येथील स्त्री रुग्णालयात सध्या वरिष्ठांची वचक राहिली नसल्याचे बोलले जात आहे .येथील काही प्रतिष्ठित महिला डॉक्टर व त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी मद्यपान करीत असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली. इतका सर्व गंभीर प्रकार चालू असताना रुग्णालय प्रशासन झोपेचे सोंग घेतेय काय ? असे बोलल्या जात आहे.
गलेलठ्ठ पगारी असताना लाजिरवाणा प्रकार का ?
येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विभाग तसेच इतर विभागात मोठ्या प्रमाणावर महिला डॉक्टर तसेच परिचारिका आधीपरिचारिका कार्यरत आहेत. चांगल्या पगारी असतानाही काही महिला डॉक्टरांना दानपेटी ची चोरी करणे इतका लाजिरवाणा प्रकार करण्या इतपत मजल जातेच कशी ? आणि पैसे चोरतोय तर कोणते चोरतोय याचा जराही विचार कसा येत नसेल. हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकशी समिती नेमली आहे….
सदरील प्रक्रिया चौकशी अधीन आहे.त्यांना सात दिवसात अहवाल देण्यास सांगितले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही याबाबत कळविले आहे.याबाबत चौकशी समिती नेमली आहे.अहवाल आल्यावर सर्व स्पष्ट होईल. – डॉ.संदीप मोरे. वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय.
महिन्याकाठी दानपेटी उघडून साहित्याची खरेदी..
नवजात शिशु विभागात ठेवलेल्या दानपेटीतून महिन्याकाठी सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत सदरील दानपेटी उघडून येथून जमा झालेला पैशातून गरोदर माता व बालकांना लागणारे साहित्य खरेदी करून त्यांनाच ते मोफत दिले जाते. मात्र मागील वर्षभरात या दानपेटीतून किती पैसे जमा झाले ? व किती वेळेस या दानपेटी ची चोरी झाली. हे मात्र आता चौकशीतूनच समोर येईल.