बुलढाणा (Buldhana) :- परिक्षा पे चर्चा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात दहावीत असतांना सहभागी झालेला आर्य लहामगे, हा पुढे युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर इंग्लंडमध्ये ‘बॅचलर ऑफ एअरोस्पेस इंजिनिअरींग विथ ऑनर्स’ साठी गेला, अन् तिथेच त्याला ही पदवी प्राप्त होत असतांना त्याची आई मनिषा ही एकटी लेकाच्या कौतूकासाठी साता समुद्रापल्ल्याड पोहचली.
आर्य ठरला एअरोस्पेस इंजिनिअरींग विथ ऑनर्स !
आर्य लहामगे याचे आजोळ बुलढाणा. त्याचे प्राथमिक शिक्षण नारायणा विद्यालय, नागपुर येथे तर सातवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण त्याने भवन विद्या मंदिर, नागपुर येथे पुर्ण केले. लहानपणापासुनचं संशोधन आणि वाचनाची आवड असलेल्या आर्यने पाचवीत असतांना विमान बनविण्याचं छोटं वर्कशॉप पुर्ण केलं आणि त्याच्या मनाने ध्यास घेतला की एक दिवस आपणही विमान बनवणं शिकायचं. शालेय जीवनापासुनचं वेगवेगळ्या स्पर्धा आणि सायंन्स प्रदर्शनांमध्ये हिरीरीने सहभागी होत असे. दोन आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर(International platform) गणिताच्या विषयात संशोधनपर पेपर ९ वी १० इयत्तेत असतांना प्रस्तुत केले होते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय विषयांवरील वाचन हा त्याचा आवडीचा छंद आहे. मॅन्चेस्टर (Manchester) येथे युनिव्हर्सिटीचा स्डुडंट अॅम्बेसेडर म्हणुन निवड झाली व त्याला कित्येक पालक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत त्याने स्वत: एक नाव कमवलं.
विद्यापिठातर्फे आयोजित एका पोस्टर स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला
त्याने इंटर्नशिपसाठी उपहग्रह मेगा कॉन्स्टलेशन आणि अंतराळाच्या पुनः प्रवेशामुळे होणार्या पर्यावरणीय परिणामांवर साहित्य सर्वेक्षण केले. आर्यने पृथ्वीच्या वातावरणात मानवजन्य वस्तुमानाच्या प्रवाहाचे परिमाणिकरण करण्यावर प्रबंध लिहीला, हे येथे विशेष! दहावीत असतांनाच आर्य पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा ‘ कार्यक्रमात सहभागी झाला होता. अशा छोट्या मोठ्या बर्याच अॅचिव्हमेंट त्याने मिळवल्या. बास्केट बॉल खेळात प्रविण असलेला आर्य अभ्यासात अतिशय हुशार आहे. अथक परिश्रम आणि संशोधक वृत्तीमुळे तो त्याचे ध्येय साध्य करतो, असे त्याची आई मनिषा हिने ‘देशोन्नती’शी बोलतांना सांगितले!