चिखली (Buldhana):- चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आपल्या लढवय्या स्वभावामुळे परिचित झाल्या आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी त्या आक्रमक होऊन सरकारशी लढतात, अडचणींत सामान्यांच्या मदतीला धावून जातात. मतदारसंघाला कुटुंब मानणाऱ्या श्वेताताईंना नागरिकही घरातील सदस्यच मानतात. त्यामुळेच त्या आज मतदारसंघातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत.
कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता ताई मतदारसंघात उपाययोजनांत व्यस्त
कोरोनाच्या (Corona) संकटात जिवाची पर्वा न करता ताई मतदारसंघात उपाययोजनांत व्यस्त असल्याचे तेव्हा अवघ्या बुलडाणा वासियांनी पाहिले. चिखली येथे तर भव्य दिव्य कोरोना सेंटरची उभारणी करुन हजारोंच्या संख्येने त्याठिकाणी रुग्णांना उपचार मिळवुन दिले. तसेच शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखील श्वेताताई नेहमीप्रमाणे या शेतकऱ्यांच्या मदतीला धावल्या. वीज प्रश्नी महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना धारेवर धरताना त्यांचा आक्रमकपणा पाहून घामाने डबडबलेले अधिकाऱ्यांचे चेहरेही शेतकऱ्यांनी पाहिले. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याची प्रचंड क्षमता, प्रदीर्घ अभ्यास आणि प्रशासनाला सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मजबूर करणाऱ्या श्वेताताई. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणणाऱ्या श्वेताताई सामान्यांच्या जवळच्या बनल्या आहेत.
दोन महिन्यांआधी उत्कृष्ट संसद पटू म्हणूनही श्वेताताईंचा महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान
एका महिला आमदारात हा उत्साह, उमेद, वेळप्रसंगीचा आक्रमकपणा, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची कर्तव्य भावना येते कुठून आणि कशी? असा प्रश्न पडतो मात्र याबाबत साहाजिकच अवघ्या महाराष्ट्राला कायम कुतूहल राहिलेलं आहे. देशातील सर्वोत्कृष्ठ आमदार म्हणूनही ताईंचा गौरव सिक्स सिग्मा एक्सलन्स अवार्डने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. शिवाय दोन महिन्यांआधी उत्कृष्ट संसद पटू म्हणूनही श्वेताताईंचा महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झाला आहे. ५ वर्षांत कमावलेले प्रेम आणि गोतावळा घेऊन आमदार श्वेताताई पुन्हा एकदा निवडणुकीला (Elections) सामोरे जात आहेत.
आमदार श्वेताताईं सामान्यांना वाटतात आपल्या कुटुंबातील सदस्य..
अडचण कोणतीही असो अगदी सामान्य नागरिक देखील श्वेताताईंना फोन लावायला कचरत नाहीत. कौटुंबिक विषय असो की कुणाचा दवाखाना, शेतीविषयक अडचणी, सरकारी कामकाज श्वेताताईंना बिनदिक्कत सांगितल्या जातात आणि विशेष म्हणजे ताईसुद्धा तातडीने त्या समस्येची दखल घेतात आणि मार्गी लावण्यासाठी सरसावतात. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्याला फोन करायला घाबरणारी माणसं ताईंना हक्कानं फोन करून अडचणी सांगतात. कोरोनामुळे अवघ्या जगातील व्यवहार थांबले होते. अनेक नेते, लोकप्रतिनिधी घरात बसून होते. तेव्हा श्वेताताई मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत मतदार संघ पिंजून काढत होत्या. नागरिकांना धीर देत होत्या. गावांत उपाययोजनांचा आढावा घेत होत्या. अतिवृष्टीमुळे बुलडाणा, चिखली तालुक्यात सातत्याने मोठे नुकसान झाले. काट्याकुट्याचा, चिखलाचा रस्ता तुडवत श्वेताताई या काळातही शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात हजर असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले त्यामुळेच त्यांनी लोकप्रियेतेचा कळस गाठला आहे.
महिला लोकप्रतिनिधी नावालाच नको..
काही मतदारसंघात केवळ महिला आरक्षण (Women’s reservation) असल्याने महिला समोर केल्या जातात. याठिकाणी मात्र सामान्यांच्या समस्यांची जाणीव असल्याने च त्या राजकारण सक्रिय झाल्या महिला बालकल्याण समिती सभापती पदावर चांगले काम केल्यानंतर त्यांना पक्षाने विधानसभेची जबाबदारी दिली तेव्हा पासुन पायाला भिंगरी लाऊन जनकल्याणासाठी फिरत आहेत. पक्ष, कार्यकर्ते व परिवाराचा पूर्ण पाठिंबा व आत्मविश्वासामुळे आपल्याला महिला लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही अडचणी आजपर्यंत आल्या नसल्याचे आ.श्वेताताई सांगतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजही महिला लोकप्रतिनिधी केवळ नावाला व बैठकांना उपस्थिती मात्र पतींची, हे चित्र ताईंनी बदललं.