अंढेरा फाट्यालगत घडली घटना
देशोन्नती वृतसंकलन
चिखली/बुलढाणा (Andhera Accident) : सावडणे करूण ॲपेने घराकडे परत येत असतांना अचानक ॲपेला रोही धडकला आणि ॲपे पलटी होवून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ही (Andhera Accident) घटना १७ ऑगस्ट रोजी चिखली ते दे राजा रोडवरील अंढेरा फाटा लगत घडली.
माहितीनुसार, अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली ते दे राजा या नॅशनल हायवे रोडचे चौपदरी सिमेंट रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे . परंतु या हायवे रोडवर असलेल्या मेरा खुर्द ते सरंबा फाट्या पर्यत रोडच्या दोन्ही बाजूला सरकारी मोठे घनदाट जंगल आहे . या जंगलात रात्रदिवस जंगली रोही जनावरांचा मुक्काम असतो ही जनावरे रोडवरून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे रोड ओलांडत असतात त्यामध्ये अनेक वेळा अपघात होवून अनेकांचे बळी गेले आहेत मात्र तरी सुध्दा संबंधीत विभागाने रोडवरल धोका दायक वळण मार्ग , जंगली प्राण्यांपासून सावधान असे फलक लावण्यात आले नाही.
त्यातच नवीन चौपदरी रस्ता असल्याने दोन्ही बाजूने लहान मोठी भरधाव वेगाने धावतात. अशातच (Andhera Police) अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या असोला बु येथील पाच ते सहा जण सावडण्याच्या कार्यक्रमासाठी तांबोळा ता. लोणार येथे गेले होते कार्यक्रम आटोपून घराकडे परत येत असताना अंढेरा फाट्या लगत अचानक एक रोही जनावरांचा कळप रोड ओलांडत असतांना एक रोही उडी घेताच ॲपेला धडकला आणि ॲपेने तीन पलट्या घेत जमिनीवर आदळला झालेल्या अपघात लीला सुनिल चव्हाण या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर ॲपे चालक बाळु भास्कर सुर्वे, जिजाबाई देवचंद चव्हाण इतर असे चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
या (Andhera Accident) घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता तात्काळ बिट जमादार वाघ व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना १०८ रूग्णवाहिका मध्ये टाकून चिखली रुग्णालयात हलविले . मात्र वृत्त लीहेपर्यत पोलिसांनी कोणतीही पुढील घटनेची माहिती दिली नाही .