बार मालक गंभीर; गुन्हा दाखल
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Andhera Crime) : जेवण करत असतांना कॅबिनमध्ये एकमेकात वाद का करता असे हटकल्याने एकाने दारूच्या नशेत चक्क बार मालकाच्या पोटात दोन वेळेस चाकू खुपसून (Andhera Crime) गंभिर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा बार मालकाच्या तक्रारी वरुण (Andhera Police) अंढेरा पोलिसांनी ११ जुलै रोजी दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera Police) अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील फाट्यावर असलेली राजवीर हॉटेल वाईन बार ही शालिग्राम चव्हाण हे भाड्याने चालवतात. बार मालक हे काउंटरवर बसलेले असतांना गावातील सुनील माणिकराव चव्हाण व त्याच्या सोबत शेखर शेख गफार हे कॅबिन मध्ये बसून दारू पिवू लागले तेव्हा बाजूचे राजू बाबुराव इंगळे यांच्या सोबत शुल्लक कारणावरून वाचावाची सुरू झाली असता आवाज ऐकून बार मालक त्यांच्याकडे गेले आणि हटकले की येथे गोंधळ करू नका बारच्या बाहेर जा असे म्हणताच दारूच्या नशेत बार मालकाला शिवीगाळ (Andhera Crime) करीत जास्त माजला का असे म्हणत, सुनील चव्हाण यांनी त्याचे खिशातून चाकू काढून अचानक जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पोटाचे डाव्या बाजूला व मध्यभागी दोन वेळा वार करून गंभीर जखमी केले.
अशी तक्रार बार मालकाचा मुलगा वेदांत शालिग्राम चव्हाण वय २२ वर्ष यांच्या तक्रारी वरुण अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी आरोपी सुनील माणिकराव चव्हाण , शेख मुख्तार शेख गफार दोन्ही राहणार मेरा खुर्द तालुका चिखली यांच्या विरुध्द कलम कलम ११८ (२) ,३५२,३५१,३(५), BNS भादवी प्रमाणे (Andhera Crime) गुन्हा दाखल केला आहे .