मंगरुळ येथील शेत शिवारातील घटना
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Andhera police) : सायंकाळच्या सुमारास मिळालेल्या गुपीत माहिती द्वारे पोलिसांनी साफळा रचून अवैधरित्या देशी दारू बाळगुण विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्याची कारवाई १८ ऑक्टोबर रोजी रोजी मंगरुळ येथे करण्यात आली.
अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera police) अंतर्गत येणाऱ्या मंगरुळ येथे दोन आरोपी अवैध रित्या शेतात टिन पत्राच्या खोलीत राजरोस प्ने दारूची विक्री करतात अशी गुपीत माहिती ठाणेदार विकास पाटील यांना देण्यात आली. त्यामुळे मोठा साफळा रचून सायंकाळच्या सुमारास मंगरुळ येथे पोलिसांनी पंचांसमक्ष सदर इसमांचे घटनास्थळ गाठून झडती घेतली असता आरोपी हनुमान आनंदा गवते आणि सचिन गिरणारे याचे ताब्यातून हजारों रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली असून आरोपींना मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे. मात्र वृत्त लीहेपर्यत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता असे पोहेकाँ गिरी यांनी दै देशोन्नती शी सांगण्यात आले.