चिखली (Buldhana) :- पोलीस खाकीचा धाकच नसल्याने अंढेरा हद्दीत दरमहिन्याला घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी रात्रीला अज्ञात चोरटयांनी असोला येथे घरफोडी करून घरातील कपात तोडून लाखोंचा माल पळविला त्यामुळे गावकरी धास्तावले आहे.
असोला येथे घरफोडी होवून लाखोंचा ऐवज लंपास
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा ते सात पोलीस स्टेशन (Police Station) आहे . मात्र या अधिकाऱ्यांचे नियोजन शून्य कारभार असल्यामुळें अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेतीची वाहतूक, मोबाईल चोरी,शेती साहित्याची चोरी, जनावरे चोरी, तसेच तर घरफोडीचे सत्र सुरूच असल्याने चोरट्यांना पोलीस खाकीचा धाकच नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे ५ मे रोजी भरोसा येथील भागवत नरहरी थूट्टे, ८ मे रोजी वसंतनगर येथील सौ पूजा ज्ञानेश्वर जाधव, ११ मे रोजी काटोडा येथील प्रशांत सोपान थीगळे, दतात्रय लिंबाजी गिरी, ५ ऑगस्ट रोजी गांगलगाव येथील गजानन हरिभाऊ म्हस्के, २८ जुलै जिजाबाई विष्णू राठोड अंचरवाडी येथील वयोवृद्ध पती पत्नीला मारहाण (Hitting)करून ऐवज लुटला आणि आता असोला येथील नजमुनबी शेख शेरू वय ६५ वर्ष यांच्या घराचे अज्ञात चोरटयांनी कुलूप तोडून लोखंडी पेटीतून १० ग्रॅम आणि ७ ग्रॅम वजनाच्या गहू मणी असलेल्या सोन्याच्या पोती, चांदीचे कडे, फुलतोडे ५० तोळे असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी अज्ञात चोरट्या विरुध्द कलम ३०५,३३१,(३),३३१(४) BNS नुसार गुन्हा दाखल करून तपास पोलीस करीत आहेत .