अमरावती (Andhra Cabinet 2024) : आंध्र प्रदेश सरकारच्या (Andhra Cabinet) शपथविधीनंतर दोन दिवसांनी राज्याला नवीन उपमुख्यमंत्री मिळाले. जनसेना पक्षाचे प्रमुख आणि सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) यांची आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू (CM Chandrababu Naidu) यांनी त्यांचा मुलगा आणि मंगलगिरीचे आमदार नारा लोकेश यांना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री केले आहे. DCM पवन कल्याणला उपमुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त पंचायती राज, ग्रामविकास आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच पर्यावरण, वन, विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्यांचाही कार्यभार देण्यात आला आहे. आयटी पोर्टफोलिओशिवाय, नारा लोकेश यांना मानव संसाधन विकास आणि आरटीजी मंत्रालय देखील देण्यात आले आहे.
नायडूंनी त्यांच्या मुलाला दिले ‘हे’ खाते
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख नायडू यांनी 12 जून रोजी मुख्यमंत्री (CM Chandrababu Naidu) म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि आघाडीचे भागीदार भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. मंत्रिमंडळातील इतर मोठ्या नावांमध्ये अनिता वंगालपुडी यांचा समावेश आहे, ज्यांना गृह आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय देण्यात आले आहे. धर्मावरमचे आमदार सत्य कुमार यादव यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय मिळाले आहे. त्याचप्रमाणे पी. नारायण यांना मनपा प्रशासन हे प्रमुख खाते देण्यात आले आहे. अमरावती राजधानी क्षेत्राच्या विकासासाठी ते जबाबदार असेल.
DCM पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी 2014 मध्ये त्यांच्या पक्षाची पायाभरणी केली होती. जनसेना संस्थापक कल्याण यांनी त्यांचा मोठा भाऊ चिरंजीवी यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरू केला. ज्यांनी 2008 मध्ये प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली होती. त्यांनी प्रजा राज्यमची युवा शाखा ‘युवराज्यम’ ताब्यात घेतली. 2009 च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला आणि नंतर काँग्रेसमध्ये विलीन झाला. DCM पवन कल्याणने (Pawan Kalyan) नंतर 2014 मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी 2014 च्या निवडणुका लढवल्या नसल्या तरी, त्यांनी TDP आणि भाजपच्या NDA युतीला बाहेरून पाठिंबा दिला. ज्यामुळे त्यांच्या विजयात काही प्रमाणात मदत झाली. टॉलीवूड अभिनेत्याने 2019 ची निवडणूक लढवली, परंतु राजोळे विधानसभा जागा वगळता सर्व जागा गमावल्या. मात्र, 2024 च्या निवडणुकीत त्यांनी राज्यात NDA आघाडीसाठी मतांची आकडेवारी वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली.