हिंगोली (Anganwadi Andolan) : अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या अनेक मागण्यांकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने २६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा धिक्कार केला. (Anganwadi Andolan) अंगणवाडी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ व कृती समिती तर्फे अनेक वेळा शासन दरबारी बैठका घेण्यात आल्या.
वेळोवेळी मागण्या सोडविल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मागण्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे (Anganwadi Andolan) अंगणवाडी कर्मचार्यांनी अनेक वेळा आंदोलन व मोर्च काढले. कर्मचार्यांच्या मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २६ जुलैला (Hingoli Zilla Parishad) हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावरून काढण्यात आला. शहरातील रस्त्यावरून हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी उपस्थित महिला अंगणवाडी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने उपस्थित महिला (Anganwadi Sevika) अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शासनाचा धिक्कार केला. त्यानंतर शिष्टमंडळाने महिला व बालविकास कार्यक्रमाधिकारी गणेश वाघ यांना निवेदन देऊन मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्या अशी मागणी केली. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य (Anganwadi Sevika) अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हा संघटक नेताजी धुमाळ, जिल्हाध्यक्षा सिंधू ठाकुर, सचिन आंधळे, सुशिला बलखंडे, माया कदम, उषा वाठोरे, अलका धुळे आदींचा समावेश होता. या मोर्चामध्ये शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.