गडचिरोली(Gadchiroli):- गडचिरोली जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतुन सुरू असलेल्या “प्रोजेक्ट कवसेर”चा एक भाग म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय कुरखेडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांनी अंगणवाडी आपल्या दारी उपक्रमांतर्गत सोबत आरोग्य कर्मचारी घेऊन आज कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवरील नक्षलग्रस्त व अतिसवेंदनशिल जंगल परिसरातील कुमुठपार व गांगसायटोला या जंगलातील वस्तीवर पायी 8 km जंगलात जाऊन तेथील गरोदर स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी (Health Check) तसेच 0 ते 6 वयोगटातील बालकांचे घरपोच लसीकरण (Vaccination) करून घेतले.
अंगणवाडी च्या सर्व सेवा घरपोच
तसेच अंगणवाडी च्या सर्व सेवा घरपोच दिल्या. या भागातील पालकांची बैठक घेऊन “प्रोजेक्ट कवसेर” अंतर्गत बालकांच्या कुपोषण (Malnutrition)निर्मूलनासाठी समुपदेशन ही केले. अंधश्रद्धा(Superstition), बुवाबाजी यापासून दूर राहण्याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वस्तीवरील प्रत्येक घरी जाऊन बालकांची वजन उंची घेऊन त्यांची श्रेणी निश्चित करू न आहार मार्गदर्शन करण्यात आले .परिसरात या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.