कुपोषणाची भिती; बालकांवर विपरित परिणाम
चिमुर (Chandrapur) :- ग्रामीण व शहरी भागात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार व लस देण्यासाठी अंगणवाडी(Anganwadi) माध्यमातून काम केले जाते. राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जवळपास १ लाख अंगणवाड्या आहे. अंगणवाड्यातुन राज्यभरातील जवळ जवळ ६० लाखांपेक्षा जास्त बालकांना पोषण आहार दिला जातो. याशिवाय त्यांना पुर्व शालेय शिक्षण(School education) दिले जाते. शालेय पोषण आहार वर्षातून तीनशे दिवस द्यावा लागतो अन्यथा कुपोषण वाढण्याची भिती निर्माण होते. वर्षातून तीनशे व महिन्यातून २५ दिवस पोषण आहार मिळाला पाहिजे असे पालक वर्गाकडून सांगितले जातेय.
मागील चार महिन्यांपासून बालकांना पोषण आहाराच नाही
मात्र शहरी भागातील अनेक अंगणवाडीत मागील चार महिन्यांपासून पोषण आहाराचा पुरवठा केलाच नसल्याचं सांगितलं जातेय. त्यामुळं बालकात कुपोषण वाढीचे प्रमाण वाढण्यास नाकारता येत नाही. त्यामुळं लवकरात लवकर अंगणवाडीत बालकांसाठी पोषण आहार पुरवठा करावा अशी मागणी पालक वर्गाकडून केले जात आहे. गरोदर माता (pregnant mother) व तिन वर्षांपर्यंत बालकांसाठी पोषण आहार वाटप केला जातो. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता त्याचा परिणाम पोषण आहार वाटपावर झाला होता मात्र आता तर कोणताच संप नसतांना सुध्दा अनेक महिन्यांपासून बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला नसल्याने पालकांची मोठ्या प्रमाणात ओरड सुरू झाली आहे.
अंगणवाडीतील बालके पोषण आहारापासून वंचित
चिमुर येथील अंगणवाड्यामध्ये एकात्मिक बाल विकास विभागाकडून (Department of Child Development) अनेक महिन्यांपासून शालेय पोषण आहार (Nutritional diet)आला नसल्याने अनेक बालके शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यात वाटप झाले पण शहरी भागातील अनेक बालके शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत.