नागपूर (Anil Deshmukh) : पुणे येथे कल्याणीनगरमध्ये (Pune hit and run case) भरधाव कारने मोटरसायकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपी कार चालकाला वाचविण्यासाठी ज्या पध्दतीने रक्ताचे नमुने बदलविण्यात आले. त्याच पध्दतीने राजकीय दबावाखाली आता मृतकच दारु पिवून होते, हे दाखविण्यासाठी त्यांचा (viscera report) व्हिसरा रिर्पोट (Alcohol Positive) येण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची खळबळजनक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Sharad Pawar) शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली. ते नागपूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पुणे हिट अँड रन प्रकरण
पुणे अपघात (Pune accident) प्रकरणात सुरुवातीला आरोपी अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी तो दारु पिवून असतांना त्यांच्या रक्ताचे नमुने बदलविण्याचा प्रयत्न झाला. हे आता जगजाहीर झाले आहे. यासाठी कशा पध्दतीने राजकीय दबावाचा वापर करण्यात आला हे सुध्दा समोर आले आहे. त्याच पध्दतीने आरोपीला वाचविण्यासाठी मृतकच दारु पिवून होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला हे दाखविण्याचे प्रयत्न सुरु झाले असल्याचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगीतले.
येथे CLICK करा : स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट; 6 जणांचा घटनास्थळीच मृत्यू
मृतकांचा शवविच्छेदनाच्या वेळी जो व्हिसरा काढण्यात आला. त्यात थोडा दारुचा अंश टाकुन (viscera report) व्हिसरा रिर्पोट हा (Alcohol Positive) आणायचा. यामुळे न्यायालयात असे समोर येईल की, मृतक हे दारु पिवून होते आणि कार चालविणारा हा दारु पिलेला नव्हता. म्हणजे विशाल अग्रवालचा मुलगा हा निर्दोष सुटु शकेल. या पध्दतीने प्रयत्न सुरु असल्याचा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.