४८ जनावरासह १२ लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त
आष्टी/गडचिरोली (Animal smuggling) : वाहनातून जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी सापळा रचून काल ३० मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आष्टी पासून १ किलोमीटर अंतरावर जनावरे तस्करी करणारे वाहन जप्त करून जनावरांची तस्करी करण्याचा डाव हाणून पाडला. या (Animal smuggling) वाहनातून ४८ जनावरे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी मोहम्मद शकील मोहम्मद समीम ( ३३) रा. नेवादा मुस्तर्का पोस्ट कुतिल्या जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश , खदीर रजाक शेख (२५) रा. धानोरा ता. केरामेरी,जिल्हा आसिफाबाद राज्य-उत्तर प्रदेश या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी चांगल्या स्थितीत असलेले ३० बैल तसेच बेशुद्ध अवस्थेतील १८ बैलांची सुटका केली. जनावरे तस्करीकरीता वापरण्यात आलेला १० लाख रूपये किमतीचा ट्रक क्रमांक श्प् ३४ ँउ २२७९ ो असा एकुण १२,४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध कलम ३२५, ३(५) बि. एन . एस. सहकलम ५(अ)(१) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच सहकलम ३, ११ (१)(ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम तसेच सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही (Animal smuggling) कारवाई आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.