27 लाख 44 हजाराचा वाहनासह मुद्देमाल जप्त, तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हट्टा (Wasmat Crime) : वसमत- परभणी रोडवरील चिखली पाटीवर 29 एप्रिल रोजी आरोपींनी संगणमत करून जनावरे कत्तली साठी घेऊन व वाहनात 25 गोवंश जनावरे कोंबून घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी सर्व यंत्रणाला कामाला लावून लावली यात पाच लाख 44 हजार रुपये, आयशर व पिकअप मध्ये घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने हट्टा पोलिसांनी तिघा जनाविरुद्ध कारवाई करून 27 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी सांगितले.
शासनाने बिना परवानगी कोणत्याही वाहनांमध्ये जनावरे घेऊन जाण्याला बंदी असताना आता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसमत परभणी रस्त्यावर चिखली पाटी जवळ 29 एप्रिल रोजी चे 13 वाजेचे सुमारास आयशर व पिकअप या वाहनांमध्ये जनावरे कोंबून घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून अवैधरित्या व परवानगी न घेता 25 जनावरे कोंबुन पाच लाख 44 हजार रुपये व एक निळ्या रंगाचे आयशर ज्याची किंमत सात लाख रुपये, एक तांबड्या रंगाचे आयशर ज्याची किंमत दहा लाख रुपये व एक पिकअप याची किंमत पाच लाख रुपये आणि 25 जनावरांची पाच लाख 44 हजार रुपये अशी एकूण 27 लाख 44 हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपी मोहम्मद तौफिक मोहम्मद महेबुब व्यवसाय चालक रा. यांगी रोड, उस्मानिया कॉलनी, परभणी ता.जि. परभणी,शेख मुखद्दर शेख समंदर व्यवसाय चालक रा. खंडोबा मंदिराचे जवळ, गेट जवळ, खंडोबा बाजार, परभणी ता.जि. परभणी,शेख समीर शेख रहिम वय 22 वर्ष व्यवसाय चालक रा. शांतीदुत नगर, खंडोबा बाजार परभणी ता. जि. परभणी यांच्याकडून जप्त करण्यात आला व हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या फिर्यादीवरून तीन आरोपी विरुद्ध प्राण्यास निर्दयीपणे वागविल्यास, प्रतिबंध कायदा 1960, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 यासह इतर कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यु डी गवळी हे करत आहेत.