इतर महिलांनीही मोलाचे मार्गदर्शन केले!
मानोरा (Anjali Kale) : येथील सौ. अंजली उमेश काळे यांनी इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल गोकुळ नगरी मानोरा येथील एकविरा दुर्गा देवी महीला मंडळाच्या (Ekvira Durga Devi Mahila Mandal) पदाधिकाऱ्यातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सौ मीनाताई हेडा, ज्योती पाटणकर, रंजना सुनील गावंडे, उषाताई मुंदडा, मंजू पुरी, डॉ. स्नेहा आडे, शितल राठोड, मुक्ताबाई गावंडे, तेजल काटे, अश्विनी पाटील, उमेश काळे आदी उपस्थित होते. यावेळी आपल्या सत्काराला (Felicitation) उत्तर देताना सौ अंजली काळे म्हणाल्या की, प्कठोर परिश्रमाने काहीही साध्य करता येते. मला सतत अभ्यास करायला सासरकडील मंडळींनी साथ दिल्याने इंग्रजी विषयात सेटच्या परीक्षेत यश संपादन करू शकले. असे सांगितले. संचालन व प्रास्ताविक सीमा मॅडम यांनी केले. यावेळी इतर महिलांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.


