बुलढाणा (Annabhau Sathe Memorial) : ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाहीतर, कामगारांच्या व श्रमिकांच्या तळहातांवर तरलेली आहे.. अशा विविध विचारांच्या माध्यमातून शोषित व्यवस्थेला साहित्यातून जगापुढे आणणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe Memorial) यांचा भव्य-दिव्य पुतळा जयस्तंभ चौकात आठवडी बाजार रस्त्याच्या प्रवेशस्थळीच धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला असून, श्रम करणाऱ्या हाताला बळ देणाऱ्या या महापुरुषाच्या पुतळ्याचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते रविवार 19 सप्टेंबर रोजी करण्यात आले.. हा क्षण आम्हा उपेक्षितांसाठी सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्यासारखा आहे, अशा भावना श्रीकृष्ण शिंदे यांनी व्यक्त करून आमदार संजूभाऊप्रती जाहीर कृतज्ञता व्यक्त केली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe Memorial) स्मारक समितीचे अध्यक्ष आ. धर्मवीर संजुभाऊ गायकवाड, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, उपाध्यक्ष बि. के. खरात, सचिव रमेश यंगड,सदस्य रामा जाधव, गजानन गायकवाड, मुकुल पारवे, मंगल भालेराव, नारायण जाधव, विकी आव्हाड, एस. एल. डोंगरे, जोगदंड सर, ऍड दिगंबर अंभोरे यांच्यासह तमाम समाज बांधवांची यावेळी प्रामुख्याने उपस्थित होती.