हिंगोली (Hingoli Credit Society) : राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडीट सोसायटी परळी वैजनाथ शाखा हिंगोली ही बंद असुन त्यातील ठेवीची रक्कम परत मिळण्याकरीता ग्राहकांनी जिल्हाधिकार्याकडे धाव घेतली आहे.
हिंगोली शहरामध्ये एका पाठोपाठ काही पतसंस्था बंद पडून त्यांनी गाशा गुंडाळल्यानंतर ग्राहकांच्या ठेवी मिळण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले जात असतांना आता राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी (Hingoli Credit Society) परळी वैजनाथ शाखा हिंगोली या पथसंस्थेतील ठेवीदारांनी गुंतवणुक केलेली रक्कम मिळेनाशी झालेली आहे. वारंवार मागणी करूनही रक्कम मिळालीच नाही.
संस्थेची शाखा बंद (Hingoli Credit Society) असल्याने काही ठेविदारांनी १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन तक्रार देऊन रक्कम परत मिळावी अशी मागणी केली. निवेदनावर दिपक अग्रवाल, आनंदा बोरसे, अनंतकुमार चांडक, मुरलीधर मुंदडा, यादव डाखोरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.




